1. कृषी व्यवसाय

Instant Food: शेतकरी तरुणांसाठी इन्स्टंट फूड उत्पादनातील संधी

शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून वर्षभर शेतात राब राब राबुन देखील त्याचा व्यवस्थित मोबदला न मिळाल्यामुळे शेतकरी हताश होऊन चिंतेच्या गर्तेत स्वतःला फसवून घेतो आणि प्रसंगी काळाला आमंत्रण सुद्धा देतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
instant food

instant food

पण उरलेल्या पाऊल वाटा सोडून शेतकरी आणि शेती पूरक व्यवसाय सुरू करण्यावर भर दिल्यास शेतकरी स्वतःचे भाग्य बदलू शकतो. सर्वच अन्नप्रक्रिया उद्योग हे शेतीमालावर अवलंबून आहेत. अनेक प्रकारचे प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या निर्मितीसाठी शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनांचे आवश्यकता असते.कामाचा वाढता व्याप, अपूर्ण वेळ, वेळेची बचत आणि कमी श्रम यामुळे इन्स्टंट किंवा कमी श्रमात बनवता येण्यासारख्या  अन्नपदार्थांना बाजारात खूप मागणी आहे. भारतात एम टी आर, किसान, डाबर आणि गिट्स अशा अनेक ब्रँड असले अनेक वर्षापासून  आपले स्थान निर्माण केले आहे. इन्स्टंट म्हणजे लगेच बनवता येण्यासारखे.

 म्हणूनच शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेल्या कृषी मालावर आधारित प्रक्रिया उद्योग करून त्यातून तुलनात्मक मोबदला मिळून तर चांगले उत्पन्न मिळू शकते. जर शेतकरी फक्त धान्याचे उत्पन्न घेत असेल तर स्वच्छ धान्याचे रेडी पोकेट्स, वेगवेगळ्या धान्यांची पिठे, मिश्रित धान्याचे पीठ ज्याला  मल्टीग्रेन म्हणून खूप मागणी आहे.अशा लहान-मोठ्या पॅक साईज मध्ये लोकांना उपलब्ध करून दिल्यास अधिक नफा मिळवता येणे शक्य आहे. म्हणूनच आपण आज मार्केटमध्ये रुचिरा शुभान्नया कंपन्यांच्या अनेक प्रकारचे पीठ जसे राजगिरा पीठ,साबुदाणा पीठ, भगर पीठ, ज्वारी आणि बाजरी चे पीठ इत्यादी विक्रीसाठी उपलब्ध असलेले पाहतो.

 शिवाय शहरी भागांतील लोकांना ब्रेड, बिस्किट, कुकीज, नूडल्स आणि फ्लेक्स याशिवाय आहार फार आवडतात. हे सर्व पदार्थ मैदा खेरीज बनत नाहीत. पण जर विविध धान्याच्या पिठाचा अंतर्भाव करून निर्मिती केली तर या पदार्थांचा लघु उद्योग सुरू करून देखील शेतकरी खुप मिळकतमिळवूशकतात. त्यासाठी शेतकऱ्यांनी थोडा पुढाकार घेऊन एखाद्या तज्ञाचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. आज महिला देखील खूप मोठ्या प्रमाणात घराबाहेर कार्यरत आहेत.

 त्यामध्ये रोजचे दोनवेळचे जेवण बनवणे सुद्धा काम करणाऱ्या स्त्रीला जिकिरीचे वाटते. अशा महिलांसाठी अनेक प्रकारचे रेडी टू कूक किंवा थोडा त्रास कमी करू शकतील अशा पदार्थांची खूप मागणी होताना दिसते. म्हणून शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या भाज्यांसाठी लागणाऱ्या विशिष्ट मसाला जसे पाव भाजी मसाला, छोले मसाला,बिर्याणी मसाला मसाला, विविध मसाल्याची पावडर, धने पावडर,हळद पावडर, जिरे पावडर,जायफळ पावडर, साधे आले लसूण वाटण या पदार्थांच्या निर्मितीतुन उत्पन्न वाढवता येऊ शकते.

 इतकेच नाही तर काही मिठाई, नाश्त्याचे पदार्थ बनवायला अवघड आणि खूप वेळ खाणारे असतात. त्यामध्ये जिलेबी, रसमलाई, गुलाब जामून, कुकी केक किंवा नाश्त्यासाठी इडली,ढोकळा, प्रोटीन केक असे पदार्थ त्वरित बनत नाहीतआणि बाहेरून आणणे खिशाला परवडत असले तरी शारीरिक दृष्ट्या त्या महिलांना करूच वाटत नाहीत असे खूप प्रकारातील मिठाईची आणि नाश्ता तले पदार्थ सुद्धा एक लघुउद्योग म्हणून शेतकऱ्याने जरूर करायला हरकत नाही.

सूप हासुद्धा एक पौष्टिक पदार्थ अनेक आरोग्य प्रती सजग लोक रोजच्या आहारात घेतात. मार्केटमध्ये उपलब्ध असलेले सूप मध्ये पिष्टमय पदार्थ असतात. परंतु रेडी टू कूक सूप मध्ये जर वाळवलेल्या भाज्या आणि काही कडधान्य यांनी मूल्यवर्धित करून पॉस्टीक पदार्थ रेडी टू कूक सूप्स चे पॅकेट सुद्धा मोठी बाजारपेठ काबीज करू शकतो. रोजच्या रोज असे अनेक पदार्थ आहेत जे बनवायला खूप वेळ आणि कष्ट लागतो. म्हणून सुद्धा लोक, युवा महिला कंटाळा करतात. या सगळ्या बाबींचा विचार केला तर शेतकऱ्यांनी असलेल्या उत्पादनाचा वापर इन्स्टंट फूड बनवल्यावर केला तर शेतीतून अधिक फायदा नक्की मिळेल

English Summary: bussiness oppurtunity in instant food bussiness for enemployment person Published on: 02 January 2022, 06:24 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters