भारतात डाळिंब लागवडीमध्ये महाराष्ट् अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये डायन लागवडीखालील क्षेत्र 1.28 लाख हेक्टर असून उत्पादन हे 11.97 लाख मेट्रिक टन होते.महाराष्ट्राचा देशाच्या एकूण उत्पादनामध्ये 66.90 टक्के वाटा आहे. महाराष्ट्रामध्ये डाळिंबाची लागवड प्रामुख्याने सोलापूर, पुणे,अहमदनगर, नासिक, सांगली आणि वाशिम जिल्ह्यामध्ये होते.
डाळिंब हे अतिशय कणखर, काटक व अवर्षणप्रवण क्षेत्रात खडकाळ जमिनीतही चांगला प्रतिसाद देणारे फळपीक आहे. डाळिंबाला सर्व हंगामात फुले येतात. त्यामुळे त्याचा कोणताही बहार धरता येतो. त्यामुळे डाळिंब हे फळ बाजारात वर्षभर उपलब्ध असते. डाळिंब हे एक बहुगुणी फळ आहे. डाळिंबाच्या दाण्यापासून 70 ते 80 टक्के रस निघतो. आजपर्यंत डाळिंब प्रामुख्याने जेवणानंतर मुखशुद्धीसाठी किंवा खाण्यासाठी वापरले जात असे. परंतु आता डाळींबापासून अनेक उत्तम, नॉटी पदार्थ तयार करता येतात. फळाची साल अमांश व अतिसार या रोगांवर गुणकारी आहे. फळांपासून जॅम, सरबत आणि अनारदाना सारखे अनेक पदार्थ तयार करता येतातडाळिंबाच्या फळांना देश-विदेशातील मोठ्या प्रमाणात मागणी असते. या लेखात आपण डाळिंबापासूनप्रक्रिया करून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची माहिती घेऊ.
डाळिब अनार दाना
साधारणपणे दहा टन डाळिंबापासून एक टन अनारदाणा तयार होतो. अनारदाना बनवतानात्यामध्ये पाच ते 14 टक्के पाणी, साडेसात ते पंधरा टक्के आम्लता, 2.0 ते 4.0 टक्के खनिजे, 22 ते 30 टक्केच चौथा, चार ते सहा टक्के प्रथिने असतात. हा पदार्थ अन्न शिजवताना चिंच, आमसूल ऐवजी अनेका पदार्थांमध्ये वापरत येतो. तसेच अनारदाना चा उपयोग चिवडा, फ्रूट सॅलेड, आईस्क्रीम, चटणी, आमटी व पानमसाला इत्यादीमध्ये केला जातो. त्यामुळे अन्नाचे चव सुधारते व अन्न स्वादिष्ट व पौष्टिक बनते. हा पदार्थ प्रामुख्याने रशियन जातीच्या आंबट डाळिंबापासून बनवतात. आंबट चव असलेल्या डाळिंब फळातील दाने सुकवून तयार केलेल्या पदार्थास अनारदाना असे म्हणतात. हा अनारदाना आयुर्वेदामध्ये औषधी म्हणून पचनासाठी व पोटाच्या विकारासाठी उपचार म्हणून अनेक आशियाई देशांमध्ये उपयोगात आणला जातो. अनारदाना बनविण्यासाठी डाळिंबाचे दाणे वाळविले जातात. डाळिंबाच्या दाण्यांना ग्रीन हाउस ड्रायर मध्ये एक दिवस किंवा ट्रे ड्रायरमध्ये 55 अंश सेल्सिअस तापमानाला सात तास सुकविण्यासाठी येते. अनारदाना वाळवून प्लास्टिकच्या पिशवी मध्ये पॅकिंग करावे व मोठ्या बाजारपेठेत पाठवा.
डाळिंब जॅम
- डाळिंबापासून जॅम बनवण्यासाठी डाळिंबाच्या एक किलो गरात एक किलो साखर, चार ग्रॅम सायट्रिक ऍसिड, चार ग्रॅम पेक्टीन व खाद्य रंग टाकावे. नंतर हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. शिजवताना ते स्टीलच्या परीने सतत हलवावे. म्हणजे घर करपत नाही व जाम चांगल्या प्रतीचा तयार होतो. मिश्रणाचा ब्रिक्स 68 ते 70 आल्यास जाम तयार झाला असे समजावेव तयार झालेला जाम कोरड्या व निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या बरणीत भरावे. अशाप्रकारे तयार केलेल्या जामची एक वर्षापर्यंत सुरक्षितरीत्या साठवण करता येते.
डाळिंब जेली
- डाळिंबापासून जेली तयार करण्याकरिता डाळिंबाचे दाणे काढून त्याचा रस काढावा. काढलेला रस पातळ कपड्यामधून गाळून घ्यावा. 50% पक्व फळाचा रस पाण्यात एकजीव करून पंधरा ते वीस मिनिटे गरम करावा. गाळलेल्या रसात समप्रमाणात साखर,7 टक्के सायट्रिक ऍसिड, व पेक्टिन टाकून उकळी येईपर्यंत शिजवावे. यावेळी मिश्रणाचे तापमान साधारणपणे 110 अंश सेंटीग्रेड असते. तयार जली मध्ये एकूण घन पदार्थाचे प्रमाण 70 डिग्री ब्रिक्स इतके असते. जेली गरम असतानाच निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावे. अशाप्रकारे तयार झालेल्या डाळिंबाच्या जेलीस उत्तम रंग, सौ आणि गुणवत्तेमुळे ग्राहकांकडून पसंती मिळते.
डाळिंब वाइन
- डाळिंबापासून शरीराला अपायकारक नसले ली व आरोग्याला पोषक असणारी वाईन तयार करता येते. डाळिंबापासून वाइनची निर्मिती करता येऊ शकते. एक किलो डाळिंब रसापासून 40 मिली मद्य मिळते. डाळिंबाच्या वाईन मध्ये मेलॅटोनीन नावाचे न्यूरो हार्मोन आढळले आहे. डाळिंबाच्या रसात आढळत नाही. व्यवसायिक द्राक्षं पासून बनवलेल्या वाइनच्या तुलनेत पाचपट अधिक अँटिऑक्सिडंट मिळतात. डाळिंब वाईन मध्ये फिनोलीक घटकांची मात्रा ही अधिक प्रमाणात आढळते.वाइन तयार करण्यासाठी निरोगी व परिपक्व डाळिंबाची फळे निवडली जातात. ती स्वच्छ धुऊन त्यांचे दाणे काढले जातात. बास्केट प्रेसच्या साह्याने फळांचा रस काढला जातो. सायट्रिक ॲसिड टाकून रसाचे आम्लता 0.7 टक्के केली जाते.त्यामध्ये 0.05 ग्रॅम प्रति 100 मिली डाय अमोनिअम फॉस्फेट टाकून हे मिश्रण तापवून थंड केले जाते. त्यानंतर त्यामध्ये दोन टक्के ईस्ट. घालून मिश्रण रबरी नळी व घट्ट बुच असलेल्या काचेच्या भांड्यात 18 ते 22 दिवसांपर्यंत थांबविण्यास ठेवले जाते. मिश्रणाचा ब्रिक्स अधून मधून तपासला जातो. ब्रिक्स पाच ते सहा औषध का कमी झाला की वाईन तयार झाली असे समजले जाते. यानंतर हे मिश्रण सेंट्रीफ्यूज मशिनच्या साह्याने स्वच्छ करून गाळून घेतले जाते. तयार झालेली वाइन स्वच्छ व घट्ट बूच असलेल्या काचेच्या रंगीत बाटल्यांत भरले जाते.
डाळिंबाच्या सालीपासून पावडर
डाळिंब फळाच्या सालीमध्ये औषधी गुणधर्म असतात. अनारदाना, ज्यूस, स्क्वॅश निर्मितीतील शिल्लक सालीचा उपयोगपावडर तयार करण्यासाठी होऊ शकेल. सालीचे प्रमाण 20 टक्के असते. सालीत 30 टक्के टॅनिन असते, यास वाळवून पावडर बनवता येते.साल उन्हामध्ये अथवा ड्रायरमध्ये 50 ते 55 अंश सेंटिग्रेड तापमानाला वाळ वून द्यावी.नंतर त्याची दळण यंत्राच्या साह्याने पावडर तयार करून साठ मेसच्या चाळणीने चाळून घ्यावे. साळून घेतलेली पावडर हवाबंद पिशवीत पॅक करून लेबल लावायचे.
डाळिंब सरबत
डाळिंबाच्या रसामध्ये 13 टक्के ब्रिक्स व 0.8 टक्के आम्लता गृहीत धरून डाळिंबासाठी चे सरबत करण्यासाठी दहा टक्के डाळिंबाचा रस, पंधरा टक्के साखर व 0.25 टक्के सायट्रिक ऍसिड या सूत्रानुसार घटक पदार्थ वापरावे. मोठ्या पातेल्यात 6.50 लिटर पाणी वजन करून घ्यावे.त्यामध्ये 1. 50 किलो साखर टाकून ती पूर्णपणे विरघळली जाईल याची दक्षता घ्यावी. तयार होणाऱ्या साखरेचा पाक पातक मलमल कपड्यातून दुसऱ्या पातेल्यात गाळून घ्यावा.त्यात एक किलो डाळिंबाचा रस टाकून तो मोठ्या चमच्याने एकजीव करा. दोन ग्लास मध्ये थोडे थोडे सरबत घेऊन एकामध्ये वीस ग्रॅम सायट्रिक ऍसिडव दुसऱ्यात 20 ग्रॅम खाद्य रंग टाकून चमचा च्या साह्याने पूर्ण विरघळून घ्यावे व नंतर सरबतामध्ये टाकून एकजीव करावे. हे सरबत 200 मिली आकारमानाच्या बाटल्यात भरूनबाटल्या थंड होईपर्यंत रेफ्रिजरेटर मध्ये ठेवावे.
रंग निर्मिती
डाळिंबाच्या सालीत मोठ्या प्रमाणात टॅनिन चे प्रमाण आहे. डाळिंबाच्या सालीचे रंगाचा स्त्रोत ग्रेना टोनीन आहे आणि तो एन मिथाईल ग्रेना टोनीन नावाच्या अलका लॉर्ड च्या स्वरूपात असतो. ग्रेना टोनीन डाळिंबाच्या सालीला रंग प्रदान करतो. याचे विलगीकरण विविध प्रकारच्या सॉल्व्हेंट चा उपयोग करून करता येते.सालीपासून मिळणारा रंग डयिंग उद्योगांमध्ये तसेच लिप्स्टिक किंवा इतर कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्य उपयोगी पडतो.
Share your comments