1. कृषी व्यवसाय

ॲक्वापोनिक्स : मत्स्य पालनाची आधुनिक पध्द्त

Aquaponics : ॲक्वापोनिक्स ही हायड्रोपोनिक्स या नैसर्गिक परीसंस्थेची सुधारीत संमिश्र आवृत्ती आहे. हायड्रोपोनिक्स या पद्धतीमध्ये मातीशिवाय वनस्पती पाण्याच्या पृष्ठभागावर वाढवल्या जातात तर ॲक्वापोनिक्स पद्धतीत हायड्रोपोनिक्स साठी वापरलेल्या पाण्याचा वापर मासे किंवा इतर जलीय प्राणी वाढविण्यासाठी करतात.

Aquaponics: A modern method of fish farming

Aquaponics: A modern method of fish farming

ॲक्वापोनिक्स ही हायड्रोपोनिक्स या नैसर्गिक परीसंस्थेची सुधारीत संमिश्र आवृत्ती आहे. हायड्रोपोनिक्स या पद्धतीमध्ये मातीशिवाय वनस्पती पाण्याच्या पृष्ठभागावर वाढवल्या जातात तर ॲक्वापोनिक्स पद्धतीत हायड्रोपोनिक्स साठी वापरलेल्या पाण्याचा वापर मासे किंवा इतर जलीय प्राणी वाढविण्यासाठी करतात. शेती व मासे हे एकमेकांना पूरक असल्यामुळे, त्यांची एकत्र रचना करून शाश्वत पद्धतीने शेती करणे शक्य आहे. अश्या प्रकारच्या व्यासायिक शेतीचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर जागतिक पातळीवर होत आहेत व त्या प्रयोगांना चांगले यश मिळत आहेत.

ॲक्वापोनिक्समध्ये नैसर्गिक चक्रानुसार भाजीपाला व झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे घटक पुरवले जातात आणि पाण्याचाही जवळपास ९०% पुर्नवापर केला जातो. या पद्धतीने आपण कमीत कमी जागेत व कमीतकमी साधनाचा वापर करून आपल्याला जास्त उत्पन्न मिळवता येते.

ज्या प्रदेशामधील शेती ही सर्वस्वी पावसावर केली जाते त्या भागामध्ये ॲक्वापोनिक्स या पद्धत्तीचा उपयोग करून कमी खर्चामध्ये भाजीपाला व मत्स्योत्पादन मिळवता येऊ शकते. ॲक्वापोनिक्स चा वापर करून शहरीभागामध्ये घरांच्या गच्चीवर देखील मासे व भाजीपाला चे पिक घेता येवू शकते.

ॲक्वापोनिक्समध्ये मत्स्यपालानातून तयार होणारी विष्टा व इतर टाकावू घटक भाजीपाला रोपांना खत म्हणून उपयोग येतात व त्याद्वारे मत्स्यपालनासाठी पाण्याचे शुध्दकरण होते. माशांची विष्टा व टाकावू पदार्थासोबतच सुक्ष्मजंतू ही वनस्पतीच्या पोषणात मदत करतात.

हे जिवाणू वनस्पतीच्या मुळा जवळ एकत्र होतात आणि माशाची विष्टा आणि घनकचरयाचे रुपांतर भाजीपाला वाढीसाठी करतात. जिवाणू माशांच्या मलमूत्राचे रोपांच्या वाढीसाठी योग्य खतामध्ये रूपांतर करतात. पाण्यामध्ये निर्माण झालेले नत्रयुक्त पदार्थ रोपांची मुळे शोषून घेवून पाणी पुन्हा मत्स्यपालनासाठी योग्य बनवितात.

ॲक्वापोनिक्समध्ये अश्या प्रकारच्या नैसर्गिक चक्राचा वापर होत असल्यामुळे पाण्याचा पुर्नवापर शक्य होतो. शेतीच्या व मत्स्यपालनाच्या पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत ॲक्वापोनिक्स प्रणालीमध्ये पाण्याची आवश्यकता अतिशय कमी आहे.

ॲक्वापोनिक्समध्ये पाण्याच्या वापराबाबत केल्या गेलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे कि घरच्या गच्ची वर केल्या जाणाऱ्या गार्डन पेक्षा ॲक्वापोनिक्स मध्ये फक्त १/१० इतकेच पाणी वापरले जाते.

ॲक्वापोनिक्स हि कल्पना खूप जुनी आहे. सुमारे १५०० वर्षांपूर्वी, दक्षिण चीन, इंडोनेशिया आणि थायलंडमध्ये हे तंत्र वापरले गेल्याची नोंद आहे. यादेशातील शेतकरी भातशेतीसोबत मत्स्यपालन करत असत. मत्स्यपालनापासून तयार होणारे नत्रयुक्त पदार्थाचा भाताच्या रोपांना खत म्हणून वापर होतो.

मागील काही दशकामध्ये पाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी मत्स्यपालनासाठी Recirculatory Aquaculture System (RAS) प्रगत झाली आहे. यापद्धतीमध्ये मत्स्यपालन टाकीमधील पाणी बाहेर काढून भौतिक व जैविक कृत्रिम पद्धतीद्वारे शुद्धीकरण करून पुर्नवापर केला जातो.

परंतु या पद्धतीमध्ये पाण्याचा वापर केला जात नाही. याउलट ॲक्वापोनिक्स तंत्रज्ञानामध्ये पाणी शुद्धीकरणासाठी भाजीपाला रोपांचा वापर करतात. RAS मत्स्यसंवर्धन तुलनेत ॲक्वापोनिक्स जास्त शाश्वत तंत्रज्ञान मानले जाते.

ॲक्वापोनिक्सद्वारे मत्स्यसंवर्धन प्रामुख्याने तीन प्रकारे केली जाते -

१. तराफा पद्धत (राफ्ट ॲक्वापोनिक्स)–
यामध्ये रोपे तराफ्यामध्ये पडलेल्या छिद्रांमध्ये ठेवली जातात. तराफा माशांच्या सांडपाण्याने भरलेल्या टाक्यांमध्ये तरंगतात. पाण्यामध्ये बुडलेली वनस्पतींची मुळे पाण्यामधून पोषक द्रव्ये शोषून घेतात व रोपे तरंगत्या तराफ्यावर वाढतात. मत्स्यपालनातील सांडपाण्याने भरलेल्या टाक्यांमध्ये तराफा तरंगतो. यामध्ये कोथिंबीर, हिरव्या भाज्या, तुळस, पालक आणि इतर लहान वनस्पतींसाठी हि पद्धत सर्वात योग्य आहे.

२. थर पद्धत (सब्सट्रेट ॲक्वापोनिक्स)–

या पद्धतीमध्ये मत्स्य संवर्धन टाकीमधील टाकाऊ पाणी पाईप्सद्वारे बाहेर काढून वनस्पतीचा वापर करून शुद्ध केले जाते व पुन्हा मत्स्य टाकीमध्ये सोडले जाते. पाईपच्या पडलेल्या छिद्रामध्ये रोपे बसवून त्यांची मुळे पाण्यामध्ये बुडतील अशी रचना केली जाते. झाडांची मुळे पाण्याच्या प्रवाहातून पोषक द्रव्ये घेऊ शकतात. या प्रकारची प्रणाली सर्व प्रकारच्या वनस्पतींसाठी योग्य आहे जसे की कोबी, कांदे, एका जातीची बडीशेप, गाजर, टोमॅटो, मिरपूड, काकडी, मटार आणि खरबूज यासाठी वापरली जाते.

३.चॅनेल ॲक्वापोनिक्स (माध्यम आधारित)-

माध्यम आधारित अक्वापॉनिक्समध्ये टाकीचा बुड विस्तारित चिकणमाती, खडे, रेव, किंवा लावा रॉक ने भरला जाते. ह्या टाकीमध्ये भाज्याचे रोपण केले जाते. माशांच्या टाकीतील पाणी भाजीपाला टाकीमध्ये पंप केले जाते जेणेकरुन वनस्पतींची मुळे माशांनी उत्पादित केलेल्या पोषक घटकांपर्यंत पोहोचू शकतील.

ॲक्वापोनिक्स शेतीचे मुख्य घटक

ॲक्वापोनिक्समध्ये रचना जागेचे स्वरूप, जागेची रचना, पाण्याची उपलब्धता, संगोपनासाठी निवडण्यात आलेल्या माशांचा प्रकार, रोपांचा (भाजीपाला) प्रकार इत्यादी बाबींवर अवलंबून असतो. ॲक्वापोनिक्स साठी खालील घटक प्रामुख्याने विचारात घेतले जातात. 

• मासे साठवण टाकी/ तळे– ही टाकी सिमेंट ,प्लास्टिक किवा जमिनीमध्ये खड्डा तयार करून तळे करणे व प्लास्टिक कागदाचे आवरण त्यावर आच्छादून घ्यावे. माशांची टाकी हि जमिनीच्या उताराच्या बाजूला किवा उताराच्या वरच्या बाजूला करावी. टाकीची किवा तळ्याची लांबी व रुंदी जमिनीच्या स्वरूपावर अवलंबून असते आणि खोली दीड मीटरपेक्षा जास्त नसावी. खोली जास्त असल्यास सूर्याची किरणेही खोलपर्यंत जात नाही. त्यामुळे शेवाळ आणि पाणसूक्ष्म किडे खाऊन जगणाऱ्या माशांची वाढ नीट होत नाही.

• पाणी व्यवस्थापनाची रचना- प्लास्टिकच्या तलावामध्ये वायू-विरहित नळीच्या चा वापर करून माशांची विष्ठा ही साफ करावी. गाळ स्थिरीकरण टाकीमध्ये स्वयंचलित पाण्याचा पंप बसवला कि पाणी झाडाच्या मुळांपाशी सहजपणे फिरते. झाडे लागवडीसाठी योग्य प्रकारचे वाफे तयार करून घ्यावे. ह्या वाफ्यामधील पाणी जमिनीत झिरपू नये याची काळजी घ्यावी. म्हणजे आपल्याला त्या पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर करता येईल.

• माशांच्या टाकीतील विष्ठा (गाळ) बाजूला काढण्याची सोय– टाकीमधील माशांची विष्ठेची विल्हेवाट लावणे खूप महत्वाचे कारण त्याचे संचयन होऊन टाकीमध्ये अमोनिया चे प्रमाण वाढते व ते माशाच्या वाढीसाठी खूप हानिकारक आहे तसेच पाण्यातील ऑक्सिजन पातळी हि यामुळे खूप कमी होते.

• टाकी व तलावामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण खुप महत्वाचे आहे व ते ५ PPM पेक्षा जास्त असावे. त्यासाठी टाकीमध्ये पाण्यात हवा मिसळणारा पंप (air pump) यंत्रणा तयार असावी.

• यामध्ये नियमित बागकामातील किटकनाशके किंवा इतर रसायने वापरली जाऊ शकत नाहीत कारण ते माशांना इजा करतात.
ॲक्वापोनिक्स चे फायदे –

• एकाच वेळी व कमीतकमी जागेत मासे आणि भाज्या वाढवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
• खते वापरण्याची गरज नाही कारण मासे झाडांना भरपूर पोषक तत्वे पुरवतात.
• एकाच वेळी सेंद्रिय भाज्या सोबत मासे हि उत्तम गुणवत्तेचे मिळतात.
• येथे मातीचा वापर होत नसल्यामुळे मातीजन्य रोगांचाक उद्भव होत नाही.
• झाडांची वाढ जलद होते कारण माशांच्या कचऱ्यापासून वाढीसाठी पौष्टिक पदार्थ मिळतात.
• पर्यावरणपुरक शेती
• ग्रामीण तसेच शहरी दोन्ही भागासाठी अतिशय उपयुक्त आहे.

जयश्री शेळके, सहाय्यक संशोधक, मो. न. ९२०९३२४२९६.
जयंता टिपले, सहाय्यक प्राध्यापक (अतिथी व्याख्याता), जलीय प्राणी आरोग्य व्यवस्थापन विभाग, मो. न. ८७९३४७२९९४.
सोमनाथ यादव, सहाय्यक प्राध्यापक, मत्स्यसंवर्धन विभाग, मो. न. ९८९०९१५६८६, मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर. महाराष्ट्र.

English Summary: Aquaponics: A modern method of fish farming Published on: 02 January 2023, 12:01 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters