गेल्या अनेक वर्षांपासून थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना बंद आहे. यामुळे येथील शेतकरी नाराज आहेत. याबाबत हा कारखाना अनेकांनी चालू करण्याची मागणी केली. मात्र तो अजूनही बंदच आहे. हा कारखाना २०११ पासून बंद आहे. तेव्हा राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर होते. त्यानंतर 2014 ते 2019 पर्यंत भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर होते. या दोन्ही राज्य सरकारांनी कारखान्याबाबत निर्णय घेतला नाही.
याबाबत भांडवल उभारणीसाठी कारखान्याच्या मालकीची काही जमीन विकावी यासाठी सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरीही दिली होती. मागील सरकारच्या काळात जाहीर लिलाव प्रक्रिया, म्हाडा या गृहनिर्माण संस्थेला जमीन देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता यावर कसलाही निर्णय झाला नाही. याच्या फाईल अद्यापही पुढे सरकल्या नाहीत.
या कारखान्याची स्वतःच्या मालकीची 248 एकर शेतजमीन आहे. यामुळे एवढी जमीन असून देखील अडचण काय? असा प्रश्न सभासद विचारत आहेत. परिसरात शेतीचा बाजारभाव साधारण दिड ते दोन कोटी रुपये प्रती एकर आहे. म्हणजेच चारशे ते पाचशे कोटी रुपयांची शेतजमीन असूनही हा कारखाना शे – दोनशे कोटी रुपयांच्या कर्जासाठी हा कारखाना कसा बंद कसा पडू शकतो, असेही अनेकजण विचारत आहेत.
या परिसरात मोठ्या प्रमाणावर गुऱ्हाळे मोठ्या संख्येने सुरू आहेत. तसेच गुऱ्हाळ चालकांची संघटना असल्याने संघटना ठरवील तोच भाव शेतकऱ्यांना मिळतो. त्यामुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत हवेलीतील शेतकऱ्यांना उसाचा बाजारभाव कमी मिळतो. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
याठिकाणी प्रतिदिन 1250 किंवा 2500 मेट्रीक टन गाळप क्षमता असलेला एक कारखाना आरामशीर चालू शकतो. आमदार आणि खासदारांनी हा कारखाना सुरु करण्याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे. यामुळे निर्णय घेयचा झाल्यास काही अडचण येणार नाही. मात्र निर्णय घेणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या;
कृषी पदवीधरांची ५० वर्षांनी जमली गट्टी; अनेक विद्यार्थी यशस्वी उद्योजक
शेतकरी राजांनो खरिप हंगामातील पीककर्जाची प्रक्रिया सुरु, असा घ्या लाभ, जाणून घ्या सर्वकाही..
.. तर ऊस उत्पादकांना आत्महत्या करण्याची वेळ येईल! नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य
Share your comments