Success Stories

देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे या समवेतच शेती क्षेत्रावर अवलंबून असलेली जनसंख्या पशुपालन देखील मोठ्या प्रमाणात करत असते. असे सांगितले जाते कि शेती व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केले जात आहे.

Updated on 28 April, 2022 10:41 PM IST

देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे या समवेतच शेती क्षेत्रावर अवलंबून असलेली जनसंख्या पशुपालन देखील मोठ्या प्रमाणात करत असते. असे सांगितले जाते कि शेती व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केले जात आहे.

पशूपालन व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखला जातो. शेतीसोबतच पशुपालन व्यवसाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी खूपच फायदेशी ठरतो. उत्तर प्रदेश मधील एका उच्चशिक्षित तरुणाने देखील गाईंचे पालन करून लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे. या नवयुवक शेतकऱ्याने पशुपालन व्यवसायात नेत्रदीपक यश मिळवीत पंचक्रोशीत मोठा नावलौकिक कमवला आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील इटावा जिल्ह्यातील मौजे बिहरी येथे राहणारा शेतकरी आशुतोष दीक्षित इटावा जिल्ह्यात एक यशस्वी शेतकरी म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे आशुतोष यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतल्यानंतर काही काळ तो नोकरीसाठी धडपडत राहिला.

मात्र सिव्हिल इंजिनिअर म्हणून त्याला कुठेच नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्याने शेती व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. खरं पाहता आशुतोषला लहानपणापासूनच शेतीव्यवसायात रस असल्याने त्याने सुरुवातीचा काही काळ वगळता नंतर नोकरीसाठी धडपड करणे थांबवले आणि पशुपालन व्यवसायाकडे आपला मोर्चा वळवला आणि आज हा अवलिया शेतकरी संपूर्ण जिल्ह्यात प्रगतिशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध असून इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी सिद्ध होतं आहे.

Important News :

MBA शेतकऱ्याची यशोगाथा!! MBA केल्यानंतर विदेशात नोकरीं केली; आता मायदेशी परतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करतोय मदत

Successful Farmer : दहावी पास महिला शेतकऱ्याने एका एकरात शिमला मिरची लागवड करून कमविले 14 लाख

शेतकरी आशुतोष दीक्षित सांगतात की, 2017 मध्ये त्यांनी कानपूर शहरातील एका नामांकित महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याला चांगली नोकरी मिळावी आणि घर सांभाळावे असे स्वप्न होते, पण नशिबाने त्याला चांगली नोकरी मिळाली नाही.

शेतकरी आशुतोष सांगतात की, त्यांनी नोकरीसाठी अनेकदा प्रयत्न केले, पण वेळेने त्यांना धक्क्याशिवाय काहीही दिले नाही. मात्र, या विपरीत परिस्थितीत देखील आशुतोष यांनी हार न मानता चांगले पैसे कमवण्याचे स्वप्न त्यांनी बघितले. शेवटी त्यांनी आर्थिक सुबत्ता मिळावी यासाठी पशुपालनाचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला.

पशुपालक शेतकरी आशुतोष सांगतात की, सुरुवातीला त्यांनी छोट्या स्तरावर पशुपालन व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. या अनुषंगाने आशुतोष यांनी सर्वप्रथम राजस्थानमधून चार साहिवाल गायी खरेदी केल्या आणि आपला व्यवसाय सुरू केला.

विशेष म्हणजे आशुतोष यांनी गाय पालन व्यवसायात यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर आशुतोष यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. गाय पालन सुरु केल्यानंतर मोजून तीन वर्षांनी आशुतोष यांनी गाय पालन व्यवसायात संपूर्ण जिल्ह्यात आपली एक वेगळी ओळख कमवली आणि आज आशुतोष जवळपास 70 गोठ्यांचे मालक आहेत. निश्चितच आशुतोष यांची ही गगनभरारी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी सिद्ध होणारी आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्याचा नांदखुळा कार्यक्रम!! कुलरची हवा देऊन अवलिया शेतकऱ्याने उत्पादित केले जरबेरा फुल

Tomato Farming : विदर्भातील नवयुवक शेतकऱ्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग!! उन्हाळी टोमॅटोची यशस्वी लागवड

साहिवाल गाईंचे दुध चवीसाठी तसेच आरोग्यदृष्ट्या खूपच अधिक फायदेशीर असल्याने आशुतोष यांच्या गाईंच्या दुधाला जिल्ह्यात मोठी मागणी असल्याचे शेतकरी आशुतोष सांगतात. या गाईच्या दुधाच्या वैशिष्ट्यामुळे त्यांच्या गाईंच्या दुधाला दरही चांगला मिळतो. याशिवाय शेणापासून लाकूड आणि खत तयार करून तो बाजारात चांगल्या दरात विकत आहेत. यामुळे पशुपालन व्यवसायातून आशुतोष महिन्याकाठी 15 लाखांची जंगी कमाई करत आहेत. निश्चीतच आशुतोष यांचे हे यश इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी सिद्ध होणार आहे.

English Summary: Successful Farmer: Started Animal Husbandry Business after Civil Engineering; Now he is earning a lot of money
Published on: 28 April 2022, 10:41 IST