देशातील युवक शेतीकडे वळताना दिसत आहेत. उच्च शिक्षण घेऊन ते शेती करण्याचा विचार करत आहेत. भल्ला मोठ्या पगाराच्या नोकऱ्या काही नवयुवक शेती करु लागले आहेत. शिवाय या शेती क्षेत्रातून ते चांगला बक्कळ नफा कमवत आहेत. अनेक शेतकरी पुत्र शेती तोट्याची असा आव आणत शेतीमधून पळ काढत आहेत मात्र असे अनेक नवयुवक आहेत जे शेतीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघतात आणि शेतीमधून चांगले उत्पन्न कमवीत आहेत.
आज आपण अशाच एका अवलिया शेतकऱ्याविषयी जाणून घेणार आहोत. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्या नेर येथील शुभम राजेंद्र नाईकने एमबीएचं शिक्षण पूर्ण करुन शेती करू लागला आहे. विशेष म्हणजे या नवयुवकाचे वडील सेवानिवृत्त वरिष्ठ शिक्षक आहेत. शुभम यांचे वडील नोकरी करून त्यांचा उर्वरित वेळ शेतीमध्ये घालत होते.
वडिलांचे शेतीवरील प्रेम शुभम यांनी लहानपणापासून बघितले होते. शेतीमध्ये काहीतरी नवीन करावे या उद्देशाने शुभम बारावी झाल्यानंतर कृषी क्षेत्रात उच्च शिक्षण घ्यायचे ठरवले. यासाठी शुभम यांनी यवतमाळच्या मारोतराव वादाफळे कृषी विद्यापीठातून बीएससी एग्रीकल्चरचे शिक्षण घेतले. बीएससी एग्रीकल्चर झाल्यानंतर शुभम यांनी पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर येथून कृषी क्षेत्रातील एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. शुभम यांना एमबीए नंतर पाच आकडी पगाराची नोकरी सहजच मिळवता येणे शक्य होते. मात्र पाच आकडी पगार आकडे धावण्यापेक्षा शुभमने समाधान शोधले आणि आपली वडिलोपार्जित सात एकर शेती करू लागला. यामध्ये एक एकर क्षेत्रात अश्वगंधाची लागवड केली.
अश्वगंधाचे बियाणे नागपूर जिल्ह्यातून त्यांच्या एका कृषी सेवा केंद्र चालक मित्राकडून मागवले. शुभम यांना एक एकर क्षेत्रासाठी पाच किलो बियाणे लागले. शुभम यांना बियाण्याच्या खर्चसमवेत अश्वगंधा लागवडीसाठी सुमारे 15 हजार रुपये खर्च आला. आता शुभम यांना आपल्या एक एकर क्षेत्रातून 3 ते 4 क्विंटल अश्वगंधा प्राप्त होणार आहे.
यामुळे शुभम यांना उत्पादन खर्चापेक्षा आठ पट अधिक नफा मिळणार आहे. एकंदरीत, गेल्या अनेक वर्षांपासून शेतीक्षेत्रात तोटा सहन करत असलेला यवतमाळ जिल्ह्यातील बळीराजा आत्महत्या सारख्या टोकाचा निर्णय घेतो आणि त्याच जिल्ह्यात शुभम सारखा सुशिक्षित तरुण शेतीकडे वळून चांगले उत्पन्न कमवतो हे नक्कीच उल्लेखनीय आहे.
Share your comments