देशात शेती क्षेत्रात मोठा बदल होत आहे, आता शेतकरी बांधव आधुनिकतेची (Modernity) कास धरून लाखो रुपयांचे उत्पन्न अर्जित करत आहेत. कधीकाळी शेती व्यवसाय हा तोट्याचा असल्याचे सांगितले जात होते मात्र आता अनेक शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रात नेत्रदीपक यश प्राप्त करत बक्कळ पैसा अर्जित केला असल्याने लोकांच्या मानसिकतेत बदल घडून आला आहे.
बळीराजाने (Baliraja) जगाला दाखवून दिले आहे की शेती व्यवसाय देखील लाखो रुपये कमवून देण्यास सक्षम आहे. शेतकरी बांधव अहोरात्र काबाडकष्ट करून, काळ्याआईच्या सेवेतून मोठे यश संपादन करतात. उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील एका अवलिया शेतकऱ्याने देखील आपल्या कष्टाच्या जोरावर नेत्रदीपक यश संपादित करत लाखो रुपयांचा नफा आपल्या पदरात पाडला आहे. जिल्ह्यातील उमरगा तालुक्याच्या मौजे बलसुर येथील एका नवयुवक शेतकऱ्याने टोमॅटो लागवडीतून विक्रमी उत्पादन घेत बक्कळ पैसा (Lots of money) कमवला आहे. विशेष म्हणजे या नवयुवक शेतकऱ्याने केवळ 15 गुंठे क्षेत्रातून दोन लाख रुपयांचा नफा कमावला आहे. या नवयुवक शेतकऱ्याचे टोमॅटो शेतीतील हे नेत्रदीपक यश इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शकाचे कार्य करणारे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
मौजे बलसुर येथील प्रगतिशील नवयुवक शेतकरी (Progressive young farmers) प्रकाश सुरवसे व त्यांचे बंधू अंबादास सुरवसे यांनी शेती क्षेत्रात एक मोठी किमया साध्य केली आहे. या युवक शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पद्धतीला राम राम म्हणत नगदी पिकांची व भाजीपाला पिकांची लागवड केली. या दोन्ही बंधूंनी टरबूज टोमॅटो मिरची या प्रमुख भाजीपाला पिकांची लागवड करत चांगले उत्पादन प्राप्त केले. तीन महिन्यांपूर्वी सुरवसे ब्रदर्स यांनी टोमॅटो लागवड करण्याचा निर्धार केला त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या अवघ्या 15 गुंठे क्षेत्रात टोमॅटो लागवड केली. सुरवसे बंधूंच्या मते, टोमॅटो लागवडीसाठी त्यांना सुमारे 15 हजार रुपये उत्पादन खर्च आला.
मात्र, टोमॅटोच्या पिकातुन चांगले उत्पादन प्राप्त झाल्यामुळे आणि टोमॅटोला चांगला बाजारभाव प्राप्त झाल्याने त्यांना चक्क दोन लाख रुपयांचा नफा प्राप्त झाला. अल्प क्षेत्रात देखील लाखोंचे उत्पन्न प्राप्त केले जाऊ शकते हे सुरवसे ब्रदर्सने आपल्या प्रयोगातून इतर शेतकऱ्यांना दाखवून दिले. प्रकाश सुरवसे यांच्या मते, शेती क्षेत्रातबदल स्वीकारणे अनिवार्य आहे. तसेच हा बदल स्वीकारताना यशच प्राप्त होईल असे नाही कधीकाळी अपयशी देखील सहन करावे लागते. परंतु अपयशातून खचून न जाता त्यातून काही सकारात्मक बाबी आत्मसात करून जिद्दीने शेती क्षेत्रात लढावे लागते.
Share your comments