शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नवनवीन यंत्र सामग्री, हायब्रीड बियानाचा वापर यामुळे शेतीमधून बक्कळ उत्पन्न मिळू लागले आहे. प्रक्रियायुक्त हायब्रीड बियाणांचा वापर केल्यामुळे कमी वेळात जास्त उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकरी बांधवांनी पारंपरिक शेती पद्धतीचा वापर कमी केला आहे. याचबरोबर शेतामध्ये नवनवीन विविध प्रयोग करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न शेतकरी बांधव करत आहेत.
सध्या देशात तसेच राज्यात ड्रॅगन फ्रूट लागवडीखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. या पिकाचे वैशिष्ठ म्हणजे हे पीक उन्हाळी तसेच दुष्काळी भागात सुद्धा चांगले येते. या पिकाला कमी पाण्याची तसेच माळरान जमीन आवश्यक असल्यामुळे या पिकाची लागवड सध्या झपाट्याने वाढत चालली आहे. वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सव्वा वर्षापूर्वी आपल्या एक एकरात क्षेत्रामध्ये ड्रॅगन या फळाची लागवड केली. पहिल्याच वर्षात या शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूट मधून एक लाख रुपयांचे नगदी उत्पादन घेतले आहे. सध्या ड्रॅगन फळाला बाजारात प्रचंड मागणी आहे शिवाय अनेक आजारांवर उपयुक्त असल्यामुळे आतंरराष्ट्रीय बाजारात सुद्धा या फळाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे शिवाय या फळाला भाव सुद्धा चांगला मिळत असल्यामुळे जास्त नफा होत आहे.
हेही वाचा:-फुलशेती: ग्लॅडिओलस वाणाच्या फुलाची लागवड, व्यवस्थापन. वाचा सविस्तर,बाजारात प्रचंड मागणी.
वरोरा तालुक्यातील आबमक्ता येथील युवा शेतकरी मनीष पसारे यांनी यूट्यूबच्या माध्यमातून ड्रॅगन फळाच्या शेतीचा अभ्यास केला. आणि आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये ड्रॅगन च्या रोपांची लागवड केली. लागवडीसाठी रोपे लातूर जिल्ह्यातून मागवली तसेच एक एकर क्षेत्रामध्ये 2 लाख रुपयांची रोपे आणली.
हेही वाचा:-9 महिन्यात पारंपरिक पद्धतीने शेती करून कमवले तब्बल 22लाख रुपये, वाचा सविस्तर
वरोरा हा तालुका दुष्काळी असल्यामुळे या बांधवांने शेतामध्ये बेड तयार करून त्यावर ड्रॅगन च्या रोपांची लागवड केली आणि ठिबक सिंचनद्वारे रोपांना पाणी दिले. शिवाय ही फळे झाडाला पिकत असल्यामुळे त्याची चव सुद्धा अधिक रुचकर लागतात त्यामुळे बाजारात सुद्धा प्रचंड मागणी आहे. पहिल्या तोड्यातील फळाचे वजन हे ३५० ते ४०० ग्रॅम आहे आणि ही फळे झाडाला पिकल्यानंतर तोडली जातात. सध्या बाजारात या फळाला २५० रुपये प्रतिकिलो असा भाव मिळत आहे.
Share your comments