1. यशोगाथा

जाणून घ्या त्यांनी जिऱ्याच्या लागवडीतून लाखोंची कमाई कशी केली

जिरे आपण रोजच्या भाजीमध्ये वापरात असतो. जिरे भाजीची चव वाढवतात. जगातील सर्वात जास्त जिरे उत्पादन भारत करतो . जगातील सुमारे ७० टक्के जिरे भारतात उत्पादित केले जातात.

Learn how they earned millions from cumin cultivation

Learn how they earned millions from cumin cultivation

जिरे आपण रोजच्या भाजीमध्ये वापरात असतो. जिरे भाजीची चव वाढवतात. जगातील सर्वात जास्त जिरे उत्पादन भारत करतो . जगातील सुमारे ७० टक्के जिरे भारतात उत्पादित केले जातात. सर्वात जास्त जिरे गुजरात आणि राजस्थान राज्यांमध्ये उत्पादित केले जातात. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील रहिवासी असलेले योगेश जोशी यांनी असाच एक प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. यामधून किती उत्पादन घेतले जाऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे.  जीरा, बडीशेप, कोथिंबीर, मेथी आणि कलौंजी सारख्या मसाल्याची ते लागवड करतात.

त्यांनी १० शेतकर्यांसोबत चालू केलेला हा व्यवसायत आता ३ हजार  हून अधिक शेतकरी जोडले गेले आहेत. सध्या ४  हजार एकर जमिनीवर शेती करीत आहेत. त्यांची वार्षिक उलाढाल ५० कोटींपेक्षा जास्त आहे. ३५ वर्षांचा योगेश म्हणतो, “घरातील लोकांना मी शेती करू नये असे वाटत होते.

मी शिकून सरकारी नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. कृषी मध्ये पदवी घेतल्यानंतर घरातील लोकांनी सांगितले की या क्षेत्रात मी शासकीय सेवेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना भीती होती की जर शेतीत काहीही मिळाले नाही तर पुढे माझे काय होईल, परंतु माझा शेती करण्याचा इरादा पक्का होता.

बऱ्याच संशोधनानंतर मी जिरे लागवडीचे ठरविले कारण जिरे ही नगदी पीक आहे, तुम्ही कधीही ते विकू शकता. तो म्हणतो- मी पहिल्यांदाच एक एकर जागेवर जिरे लागवड केली. . अनुभव आणि सल्ल्याअभावी  आम्ही सुरुवातीला तोट्यात गेलो होतो, यश आले नाही. नुकसान झाले. यानंतरही मी धैर्य गमावले नाही. आम्ही सेंट्रल एरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट (CAZRI) येथील कृषी वैज्ञानिक डॉ. अरुण के. शर्मा यांची मदत घेतली.

गावाकडे आल्यानंतर शर्मांनी माझ्याबरोबर आणखीही गावात प्रशिक्षण दिले, त्यानंतर आम्ही पुन्हा जिरेची लागवड केली आणि नफा कमावला. त्यानंतर आम्ही विस्तार वाढवला आणि विविध पिकांची लागवड केली. योगेशने ऑनलाईन मार्केटींगची सर्व साधने वापरली. तसेच अनेक कंपन्यांशी संपर्क साधला. तो सध्या बऱ्याच परदेशी आणि देशांतर्गत कंपन्यांसमवेत करार करत आहे. हैदराबादस्थित एका कंपनीबरोबर त्यांनी ४०० टन किनोवा कॉन्ट्रॅक्ट शेतीसाठी करार केला आहे.

English Summary: Learn how they earned millions from cumin cultivation Published on: 29 April 2022, 02:53 IST

Like this article?

Hey! I am शैलेश म्हातारदेव डमाळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters