सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला पोहोचले आहेत. त्यामुळे बाईक वापरणे कठीण होऊन बसले आहे. अशातच सध्या अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती मध्ये मोठ्या प्रमाणात उतरत आहेत.
परंतु या सगळ्या परिस्थितीत आपल्याकडे असे संशोधक आहेत जे देशी जुगाडाच्या माध्यमातून कल्पना च्या पलीकडे काहीतरी निर्मिती करून दाखवतात.जेव्हा ही कल्पना निर्मितीत उतरते तेव्हा विश्वास बसणार नाही असे काही तरी निर्माण होत असते. अशीच एक भन्नाट कल्पना सत्यात उतरवून दाखवण्याची किमया मोहोळ तालुक्यातील सोहाळे गावचे दीपक नाईक नवरे यांनी करून दाखवले आहे. यात्याच्या यशस्वी प्रयोगाबद्दल या लेखात माहिती घेऊ.
देशी जुगाडातून बनवली मोटरसायकल
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सोहाळे या गावचा रहिवासी असलेली दीपक नाईक नवरे जेव्हा दोन वर्ष लॉक डाऊन होते तेव्हा शेतीसोबत मोटार रिवाइंडिंग चे काम करत असताना त्यांच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली व त्यांनी लागलिस या कल्पनेवर काम करणे सुरू केले. सध्या इलेक्ट्रिक वाहने बाजारात येत आहेत. परंतु या वाहनांना चार्जिंग करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. परंतु इलेक्ट्रिक वाहनांमध्ये असणारी ही समस्याचत्या पठ्ठ्याने दूर गेली. त्यांनी बनवलेल्या मोटरसायकल मध्ये अशी व्यवस्था केली की गाडी बंद झाली असली तरी तिची चार्जिंग होत राहील. दीपक यांनी बनवलेली मोटर सायकल तुम्ही कितीही किलोमीटर चालवली तरी तुम्ही फुकटात चालवूशकतात. शेतामध्ये फवारणी करण्यासाठी देखील या गाडीचा वापर दीपक करतो.
दिपकने बनवलेल्या या गाडीची वैशिष्ट्ये
दीपकने या गाडीमध्ये 48 होल्टची बॅटरी बसवले आहे. हे बॅटरी चार्ज व्हावी यासाठी काही इलेक्ट्रिक उपकरणे आणि 750 वॉटची मोटर बसवली आहे ज्यावर मोटर सायकल सुसाट पळते. गाडी बंद झाली असली तरी ती चार्ज होत राहते आणि सुरू असताना तर सांगायची गरजच नाही. या गाडीची ट्रायल घेण्यासाठी दीपक स्वतः शंभर किलोमीटरचा प्रवास करून आला होता. या गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचे इंधन आणि ऑइल नसल्याने शंभर टक्के प्रदूषण मुक्त आहे. आणि चार्जिंग व पेट्रोल वर कुठल्याही प्रकारचा खर्च नसल्याने फुकटात तुम्ही ती चालवू शकतात. यासाठी दीपक यांनी जुन्या गाडीवर 40 ते 50 हजार रुपयांचा खर्च केला आहे. याबाबतीत दिपक म्हणतो की जर या गाडीचे पेटंट मिळाले तर कमी खर्चात आणि अत्याधुनिक रीतीने ही गाडी बनवणे शक्य होणार आहे.
ही गाडी बंद जरी असते तरी ऑटोमॅटिक चार्जिंग होते व 250 होल्ट वीजपुरवठा तयार होतो हे मल्टीमीटर लावून पाहूशकतात.सध्या विविध इलेक्ट्रिक गाड्यांसाठी इंजिनियर्स प्रयोग करीत असताना शेतकरी पुत्रानेकेलेला हा अनोखा जुगाड नक्कीच संशोधकांना आश्चर्यचकीत करणारा आहे हे नक्की.(स्रोत-abp माझा)
Share your comments