घरात कमालीची गरिबी होती, बुद्धिमत्ता हेच भांडवल मानून अशोक खाडे यांनी उद्योग सुरु केला. आज खाडे यांनी सुरु केलेल्या ‘दास ऑफशोअर’ या कंपनीत सुमारे साडेचार हजार कर्मचारी आणि सुमारे पाचशे कोटींची वार्षिक उलाढाल आहे. अशोक खाडे यांनी पेड. ता. तासगाव, जि. सांगली येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मोठ्या भावाच्या मदतीने मुंबईची वाट धरली.
अशोक खाडे हे एक यशस्वी उद्योजक आहेत ज्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात “जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट’ हे ब्रीदवाक्य घेऊन केली आहे. खाडे यांचे वडील चर्मकार होते तर त्यांची आई आणि बहीण दुसऱ्याच्या शेतात काम करत होत्या. अशोक खाडे आणि त्यांच्या भावंडांनाही कधी कधी कामावर जावं लागायचं. खाडे यांचे सातवीपर्यंत शिक्षण गावातच झाले. खाडे पुढील शिक्षणासाठी तासगाव बोर्डिंग स्कूलमध्ये गेले. बोर्डिंगमध्ये पोटभर जेवण मिळत नव्हते पण मोठे होण्याचे स्वप्न असल्याने कोणतीही तक्रार नव्हती असे खाडे सांगतात.
१९७२ मध्ये खाडे यांना अकरावीत चांगले गुण मिळाले. त्या वर्षी मोठा दुष्काळ पडला होता, खाडे सांगतात घालायला कपडे नव्हते, आम्हाला शिकवणारे देसाई सर कळवळले. त्यांनी शर्ट आणि पायजमा घेऊन दिला. अकरावीच्या ऐन परीक्षेत पेनचा निफ मोडली. जोशी सरांनी अडचण समजून घेत निफ आणून दिली. साठ टक्के मार्क पडले. आज माझ्याकडे हजारो रुपयांचा पेन आहे, परंतु अकरावीतील “त्या’ पेनची किंमत कशालाही नाही. तो पेन अजून माझ्याकडे आहे.
वडील बोर्डिंगवर आम्हाला भाकरी आणून द्यायचे आणि म्हणायचे, “राजांनो, मी गरीबी आणि दुष्काळ आणलेला नाही. धीर सोडू नका, माळावर जोपर्यंत पळस आहे तोपर्यंत आपल्याकडे गरिबी आहे, असे समजू नका. खूप शिका.’ वडिलांचे शब्द काळजाला भिडले,” खाडे म्हणाले. खाडे कुटुंब १९७५ मध्ये मुंबईत पोहोचले. " खाडे सांगतात मला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते," रोजीरोटीसाठी आम्ही तिघेही भाऊ माझगाव डॉकमध्ये नोकरी करायला लागलो.
मी डिझाईन विभागात होतो. मोठ्या भावाच्या आग्रहावरून अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेतला. नोकरी आणि शिक्षण दोन्ही सुरू झाले. याच कंपनीच्या कामासाठी १९८३ मध्ये मला जर्मनीला जाण्याची संधी मिळाली. नवी आशा निर्माण झाली. गरिबी होतीच पण स्वतःसाठी काहीतरी करायचे ठरवले. १९९२ मध्ये त्यांनी राजीनामा दिला. इतर भावांनीही राजीनामा दिला. ते तिघे एकत्र राहत होते आणि घरात एक प्रकारचे अभियांत्रिकी वातावरण होते. गरिबीचे जीवन जगण्यापेक्षा थोडेच आयुष्य जगू पण चांगले जगू हे लक्षात घेऊन दास ऑफशोअर ची निर्मिती झाली.
मराठी माणूस, आडनाव खाडे म्हटल्यावर नोकरी कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तीन भावांच्या (दत्तात्रय, अशोक आणि सुरेश) नावांची आद्याक्षरे घेऊन कंपनीचे नाव 'दास' ठेवले. नाव "के. अशोक असे सांगायचो. पहिले काम माझगाव डॉकमध्ये मिळाले. मुंबईत पहिला स्कायवॉक बांधला. मग मी मागे वळून पहिले नाही. "
मराठी असल्याचा त्यांना प्रचंड अभिमान आहे. त्यांच्या कंपनीत चेहऱ्यावर चिंता असलेला एकही कर्मचारी दिसणार नाही. ज्या शेतात माझी आई शेतमजूर म्हणून काम करत होती, ती शेती मी विकत घेतली आहे. ज्या गावात दगडू चांभाराचा मुलगा अशी ओळख होती, ते गाव आता “आबा’ म्हणून ओळखत आहे. आजही आम्ही भाऊ एकत्र कुटुंब म्हणून राहतो. एकत्र कुटुंबात जी ताकद आहे, ती कशातच नाही. त्या भक्कम आधारामुळेच आम्ही आयुष्यात काही तरी करू शकलो.
महत्वाच्या बातम्या
टाकळीभान उपबाजारातील प्रकार! कांद्याला मिळाला प्रतिकिलो 1 रुपये भाव; शेतकऱ्याचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
Healthy Bath: मिठाच्या पाण्याने आठवड्यातून दोनदा तरी करा आंघोळ, होतील हे आश्चर्यकारक फायदे
Share your comments