MFOI 2024 Road Show
  1. यशोगाथा

घराच्या छतावर उभारला बटेर फार्म; कमी गुंतणुकीवर केली लाखो रुपायांची कमाई

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे ही म्हण वर्धातील तरुण उद्योजक प्रविण यांनी खरी केली, ती आपल्या बटेर फार्मिग व्यवसायातून. प्रविण वांढरे हे यशस्वीपणे बटेर पालनाचा व्यवसाय करत आहेत.या व्यवसायासाठी प्रविण यांच्याकडे जमीन नव्हती, पण हिंमत न हारता प्रविण यांनी आपल्या घराच्या छतावर बटेर फार्म उभारला आणि बक्कळ कमाईचा मार्ग खुला करत अनेक युवकांना नव्या व्यवसायाची ओळख करुन दिली.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे ही म्हण वर्धातील तरुण उद्योजक प्रविण यांनी खरी केली,  ती  आपल्या बटेर फार्मिग व्यवसायातून. प्रविण वांढरे हे यशस्वीपणे बटेर पालनाचा व्यवसाय करत आहेत.या व्यवसायासाठी प्रविण यांच्याकडे जमीन नव्हती, पण  हिंमत न हारता प्रविण यांनी आपल्या घराच्या छतावर बटेर फार्म उभारला आणि बक्कळ कमाईचा मार्ग खुला करत अनेक युवकांना नव्या व्यवसायाची ओळख करुन दिली.

प्रविण हे बटेर पालानाचा व्यवसाय गेल्या तीन वर्षांपासून करत आहेत. या तीन वर्षात प्रविण यांना फक्त आणि फक्त नफाचं झाला आहे. पोल्ट्री फार्मसाठी आपल्याकडे शेतजमीन असणं आवश्यक असतं पण बटेर पालन हे कमी जागेतही केले जाते याचं सुंदर उदाहरण प्रविण यांनी  वर्धा येथील तरुणांसमोर ठेवले आहे. शेतीला पुरक व्यवसाय करायचा म्हटलं म्हणजे आपल्या डोक्यात पोल्ट्रीचं येत असते. पण तुम्हाला माहिती आहे का? कमी गुंतवणुकीत पोल्ट्रीपेक्षा अधिक नफा देणारे अनेक व्यवसाय आहेत. यातील एक व्यवसाय म्हणजे बटेर पालन. प्रविण वांढरे यांनी  सुरू केलेल्या ‘’भूमी बटेर फार्म’’चे उदाहरण वाचल्यानंतर आपल्यालाही बटेर फार्मविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा नक्कीच होईल.

प्रविण वांढरे हे आधी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मार्केटिंग विभागात काम करत होते.पण आपला स्वता:चा व्यवसाय असावा असं त्यांनी नेहमी वाटत. त्याच विचाराने ‘भूमी बटेर फार्म’ची सुरुवात झाली. शेतीशी निगडीत असलेला व्यवसायच आपल्याला करायचा असल्याचं प्रविण यांनी ठरवलं होतं. नोकरी करत असताना प्रविण हे बटेर फार्मिगविषयी माहिती मिळवत होते. बटेर पालनचं का करायचं अशा प्रश्न जेव्हा कृषी जागरण मराठीने त्यांना केला, तेव्हा त्यांनी सांगितले की, काही वर्षांपुर्वी त्यांनी युपीतील बटेर पालनाविषयीचा व्हिडिओ पाहिला होता. त्यात असलेल्या माहितीने बटेर पालन करण्याकडे आपण आकर्षित झाल्याचे ते म्हणाले.

 

शेत जमीन नसल्याने ते पोल्ट्रीचा व्यवसाय करु शकत नव्हते. शिवाय बटेर पालनासाठीही शेडसाठी जमीन असणं आवश्यक होते.ही समस्या त्यांच्यापुढे होती, या समस्येवर मार्ग काढत प्रविण यांनी आपल्या घराच्या छतावरच बटेर पालनाचा व्यवसाय सुरू केला. बटेर फार्मिंग करायचंय हे ठरल्यानंतर बटेरचे पक्षी कुठे मिळतील याचा तपास त्यांनी नोकरी सुरू असताना चालू केला.महाराष्ट्रात बटेर पालन जास्त केले जात नसल्याने त्यांना सहजासहजी याची माहिती मिळाली नाही. खूप तपास केल्यानंतर प्रविण यांना चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील एका हॅचेरीचा शोध लागला.ही हॅचेरी होती समीर बेग यांची. या हॅचेरीमधून प्रविण यांनी बटेरचे पक्षी घेतले.पहिल्यांदा आणलेल्या पक्ष्यांची प्रविण यांनी थेट विक्री केली. दुसरी बॅच घेतली तेव्हा त्यांनी स्वता:ची हॅचेरी सुरू करण्याचे ठरवले. सुरुवातीला ५०० अंड्याची हॅचेरी त्यांनी तयार केली. आता त्यांच्याकडे १५०० पक्षी आहेत. 

अशी झाली हॅचेरीला सुरुवात

१० बाय १०च्या खोलीत त्यांनी ब्रुडिंग केली. त्यानंतर घराच्या छतावर एक हजार पक्ष्यांसाठी  पिंजरा बनवला. ब्रुडिंग झाल्यानंतर पक्षी पिंजऱ्यात टाकले. प्रविण यांनी आपल्या घरावर सात फूट लांब आणि सहा फूट उंचीचा पिंजरा बनवला आहे. यात तीन फूट रुंदीचे चार कप्पे आहेत. हे कप्पे दीड फूट उंचीचे आहेत. यात पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी एक ड्रिंकर लावले आहे. तर पिंजऱ्यांच्या दुसऱ्या बाजूला खाद्यसाठी फिडर लावले आहे. हे फिडर पीव्हीसी पाईपपासून त्यांनी बनवलेले आहे.तीन वर्षांपुर्वी प्रविण यांनी हा पिंजरा बनवला होता. पुर्ण पिंजरा आणि पक्ष्यांची किंमत पकडून प्रविण यांना ३० हजार रुपयांचा खर्च बटेर फार्म सुरु करण्यास आला होता. आतापर्यंत त्यांनी १५ बॅचेच  काढल्या आहेत.आपल्या भुमी बटेर फार्मच्या यशाविषयी बोलतांना

 

बटेरचे अंडे

बटेरचे अंडे

बटेरचे वैशिष्ट्ये

हे पक्षी पक्षी संशोधन केंद्रातून बनवले जातात. यामुळे हे पक्षी अधिक अंडी देतात. जंगली बटेरवर बंदी असून हे पक्षी फार कमी अंडे देतात. बटेरपासून मिळणाऱ्या अंड्याची किंमत ही १० रुपये असते. मेट्रो शहरात या अंड्यांना मोठी मागणी असते.बटेर मादी ही वयाच्या ४० ते ५० व्या दिवसाला अंडी देते. वर्षभरात २०० ते ३०० अंड्यांचे उत्पन्न मिळते. बटेर पक्षाचे आर्युमान हे तीन वर्ष असते. दोन पक्षाची किंमत ही साधरण ३०० रुपये असते. एका पक्षाचे वजन हे २०० ते ३०० ग्रॅम असते. प्रविण वांढरे  हे पक्षी ३०० ते ३५० रुपयांना विकतात. 

बटेरचे अंडे खाण्याचे फायदे-

  • बटेरचे अंडे हे कोंबड्याच्या अंड्याला योग्य पर्याय आहेत.

  • इम्युनिटी आणि स्मरणशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर.

  • खनिज आणि जीवनसत्व अधिक असतात. खोकला आणि दमावर फायदेशीर.

  • ताप येऊ नये यासाठी हे अंडे फायदेशीर आहेत.

  • रक्ताच्या लाल पेशी वाढविण्यासाठी चांगले असतात.

  • बटेरचे मांस खाण्याचे फायदे

  • प्रथिने, खनिजे वाढविण्यास फायदेशीर.

  • कॉलेस्ट्रोल कमी करण्यासाठी  फायदेशीर.

  • रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त

  • मुतखडा किडनी संबंधी विकारावर उपयोगी.

बटेर फार्मिंगमध्ये कोणत्या कंपनीशी करार नसल्याने शेतकऱ्यांना अधिक फायदा होत असल्याचं प्रविण वांढरे सांगतात. कारण पक्ष्यांची आणि अंड्यांची किंमत ते स्वत ठरवतात. प्रविण म्हणतात की, शेतकरीला आपल्या मालाची मार्केटिंग करता येत नाही. यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळत नाही. बटेर फार्मिंगविषयीचा मूल मंत्र सांगताना ते म्हणाले की, आपण आपल्या मालाविषयी व्यवस्थित माहिती द्यावी किंवा व्यवस्थिती मार्केटिंग करावी. होलसेलकडे न वळता रिटेल विक्रीकडे अधिक लक्ष द्यावे. त्यात आपण आपल्या ग्राहकांशी थेट संपर्क करत असतो. यामुळे आपली जाहिरात होत असल्याचे ते म्हणातात. प्रविण वांढरे बटेर पालनाचे प्रशिक्षण शिबीर देखील घेतात. आतापर्यंत त्यांनी वर्धातील अनेक युवकांना याचे प्रशिक्षण दिले आहे. या व्यवसायाचा तपास करणाऱ्यांमध्ये  सुशिक्षित तरुण अधिक असल्याचे प्रविण सांगतात.

 

या प्रशिक्षणात प्रविण वांढरे हे फक्त नफ्याची बाजू सांगत नाहीत तर संभाव्य तोट्याचीही जाणून युवकांना करु देत असातात. यामुळे त्यांचे शिबिराला गर्दी असते. आपल्या कामाविषयी बोलताना प्रविण म्हणाले की, आपण यातील काय धोके आहेत किंवा काय नुकसान होऊ शकते. याची माहिती युवकांना दिले तर त्यांच्या मनाची तयारी होत असते. यासह ते युवकांना मार्केटिंग कशी करावी याचे ज्ञान देतात.बटेर फार्मिंग करताना ब्रुडिंग महत्त्वाचे असल्याचे वांढरे सांगतात.या पक्ष्यांचे पालन करत असाल तर स्वत काम करावे. तुम्ही मजुरांवर अवलंबून राहू नका, असं वांढरे म्हणतात.

ब्रुडिंग करताना काय करावे

  • ज्या जागी ब्रुडिंग करायची असेल ती जागा निर्जंतुकीकरण करावे. शेणाच्या पाणीने किंवा चुन्याने ती जागा स्वच्छ करावी.

  • पिल्ले ठेवण्यासाठी वापरण्यात येणारा गव्हाचा भुसा हा नरम असावा. त्यावर पेपर टाकावा.पिल्ल्यांच्या सभोवताली पत्र्याची रिंग टाकावी.

  • पिल्ले मोठे होऊ पर्यंत तापमान व्यवस्थित ठेवावे.

  • पाण्याच्या भांड्यात म्हणजेच ड्रिंकरमध्ये खडे टाकावेत, जेणेकरून हे पक्षी पाण्यात पडून मरू नये.

 

अधिक माहितीसाठी संपर्क करा.

प्रविण वांढरे - मोबाईल नंबर.  8087329632
8329271247

English Summary: A man start quail farm on house terrace , earn lakh rupees on small investment Published on: 23 January 2021, 05:41 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters