केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सुमारे पाच कोटी खातेधारकांना आर्थिक वर्ष 2022 साठी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ ठेवींवर 8.1 टक्के व्याज मंजूर केले असून आता लवकरच पीएफ चे व्याज EPFO खाते धारकांच्या खात्यात ट्रान्सफर केले जाईल.
जर तुमच्या खात्यामध्ये पाच लाख रुपये असतील तर तुमच्या पीएफ खातात 40 हजार रुपयांपर्यंत व्याज येऊ शकते. सरकार लवकरच पीएफ खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याच्या अखेरीस व्याजाचे पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. तुमच्या खात्यात जर पाच लाख रुपये असतील तर 40 हजार रुपयांपर्यंत व्याज तुम्हाला मिळू शकते.
पीएफ होईल लवकर ट्रान्सफर
EPFO आता कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ खात्यांमध्ये व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्यास सुरुवात करेल. पीएफ ठेवींवरील हे 8.1टक्के व्याज आर्थिक वर्ष 1978 नंतरचे सर्वात कमी आहे. त्या वेळी आठ टक्के व्याजदर होता.
या मार्गांनी तुम्ही अगदी घरी बसल्या तुमच्या पीएफ खात्यात शिल्लक तपासण्यासाठी या मार्गांचा अवलंब करा
1- मिस-कॉल द्वारे तपशील जाणून घेणे- तुम्ही एक मिस कॉल देऊन तुमची ईपीएफ शिल्लक देखील जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.
2- संकेतस्थळाचा वापर करून- तुम्ही तुमची पीएफ खात्यातील शिल्लक ऑनलाईन तपासण्यासाठी एपीएफ पासबुक पोर्टलला भेट द्या.यामध्ये तुमचा युएएन क्रमांक आणि पासवर्ड वापरून या पोर्टल वर लॉगिन करा. त्यानंतर यामध्ये डाउनलोड / view passbook वर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्यासमोर पासबुक उघडेल ज्यामध्ये तुम्ही तुमची शिल्लक पाहू शकता.
3- उमंग ॲप्सचा वापर करून-जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही जेव्हा हवे तेव्हा उमंग ॲपच्या माध्यमातून तुमची ईपीएफ शिल्लक तपासू शकता. त्यासाठी UMANG AF ओपन करा आणि EPFO वर क्लिक करा.
यामध्ये एम्प्लोयी सेंट्रींक सर्व्हिस वर क्लिक करा आणि त्यानंतर व्ह्यू पासबुक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा यूएन नंबर आणि पासवर्ड टाका. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल व त्यानंतर तो ओटीपी प्रविष्ट करा. त्यानंतर तुम्हाला पीएफ खात्यातील शिल्लक दिसेल.
नक्की वाचा:पती-पत्नी दोघांसाठी उपयुक्त योजना! एकदाच भरा पैसे, मिळवा 12 हजार रुपये दरमहा पेन्शन
Published on: 13 June 2022, 08:59 IST