Others News

मगरींना सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक मानले जाते. त्यांचा जबड्यात कोणताही प्राणी किंवा पक्षी अडकला की, त्याची सुटका अशक्यच आहे. सध्या व्हायरल झालेला विडिओ खूपच धक्कादायक आहे आणि तुमच्या अंगावर काटा आणणारा आहे. कारण यामध्ये तुम्ही पाहू शकता की, मगरीने एका व्यक्तीला जिवंत गिळले आहे.

Updated on 29 June, 2022 10:38 AM IST

सोशल मीडियावर अनेक विडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक प्राण्यांचे भयानक विडिओ देखील असतात, असाच एक विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मगरींना सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक मानले जाते. ते पाण्यातच शिकार पकडत नाहीत, तर ते पाण्याबाहेरही शिकार करतात. आपण याच्या अनेक विडिओ देखील बघितल्या असतील. मग त्यात वाघ, बिबट्या याचा देखील समावेश होतो. त्यांचा जबडा खूपच शक्तिशाली असतो.

त्यांचा जबड्यात कोणताही प्राणी किंवा पक्षी अडकला की, त्याची सुटका अशक्यच आहे. सध्या व्हायरल झालेला विडिओ खूपच धक्कादायक आहे आणि तुमच्या अंगावर काटा आणणारा आहे. कारण यामध्ये तुम्ही पाहू शकता की, मगरीने एका व्यक्तीला जिवंत गिळले आहे. यामुळे हा विडिओ नेमका खरा आहे की खोटा याबाबत देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीला त्याचे मित्र मगरीच्या तोंडातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचा एक मित्र मगरीच्या तोंडात हात घालून मित्राला काढतो, तर दुसरा मित्र मगरीची शेपटी धरुन उभा असतो. हा व्हिडीओ खरोखरंच अंगावर काटा आणणारा आहे. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. असे या विडिओमध्ये दिसत आहे.

चिखलातून वाट, दुचाकी ट्रकमधून प्रवास, लंघुशंकेचं कारण देत शिवसेना आमदार आले पळून...

या व्हिडीओला सोशल मीडियावर अनेकांनी शेअर आणि कमेंट्स करत आहेत. तर काहींनी कमेंट्समध्ये हा व्हिडीओ खोटा असल्याचे म्हटले आहेत. मात्र हा विडिओ बघून अनेकांना घामच आला आहे. अनेकांनी या विडिओवर अनेक कमेंट केल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर या विडिओची जोरदार चर्चा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या;
कांद्याला प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे दर का? अमोल कोल्हे यांनी घेतला मोठा निर्णय
"पेरणीसाठी कर्ज द्या, नाहीतर सावकाराकडे शेती गहाण ठेवावी लागेल"
'माझं काम ठोकायचं, गद्दारांना सोडणार नाही'

English Summary: The crocodile swallowed the young man in front of a friend, the video is going viral on social media
Published on: 29 June 2022, 10:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)