Others News

भारतामध्ये झारखंड आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये युरेनियमचे साठे आहेत. परंतु आता त्यापाठोपाठ राजस्थान राज्यातील सिकरच्या खंडेला परिसरात खाणकामाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली

Updated on 27 June, 2022 11:54 AM IST

 भारतामध्ये झारखंड आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये युरेनियमचे साठे आहेत. परंतु आता त्यापाठोपाठ राजस्थान राज्यातील सिकरच्या खंडेला परिसरात खाणकामाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली

असून या ठिकाणच्या जवळ जवळ 1086.46 हेक्टर क्षेत्रात 1.2 कोटी टन युरेनियम आणि संबंधित खनिजाचा साठा मिळाल्यानंतर सरकारच्या चेहऱ्यावर देखील आनंद फुलला आहे.  यामुळे आता रोजगारापासून तर गुंतवणुक पर्यंतचे बरेच मार्ग मोकळे होणार आहेत.

 युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करेल खाणकाम

 राजस्थानच्या खान आणि पेट्रोलियम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.सुबोध अग्रवाल यांनी रविवारी सांगितले की, राजस्थान सरकारने सीकरजवळील खंडेला तालुक्यातील रोहिल येथे 

युरेनियम खाण उत्खनन करण्यासाठी युरेनियम कार्पोरेशन ऑफ इंडियाला लेटर ऑफ इंटेन्ट जारी केले असून देशात झारखंड आणि आंध्र प्रदेश यानंतर खतांमध्ये युरिनियमचे प्रचंड साठे सापडले आहेत.

नक्की वाचा:Goat Species: रोहीलखंडी,सुमी,कहामी, सालेम काळी 'या शेळ्यांच्या जाती' शेळीपालनात देतील बक्कळ नफा

युरेनियम हे  जगातील जेवढे दुर्मिळ खनिजे आहेत त्यापैकी एक आहे.  अनुउर्जा साठी देखील एक मौल्यवान खनिज म्हणून युरेनियम ची ओळख आहे.

यामुळे आता जगाच्या नकाशावर राजस्थानचे नाव चमकणारा असून त्या दृष्टिकोनातून गुंतवणूक, महसूल आणि रोजगाराची नवीन कवाडे उघडी होणार आहेत.

नक्की वाचा:PM Kisan योजनेत मोठा बदल, आता मिळणार हजार रुपये, 'ही' कागदपत्रे जमा करावी लागणार

खाणकामाची प्रक्रिया अशाप्रकारे सुरू होईल

UCIL अणु उर्जा विभाग, अणु खनिज उत्खनन आणि संशोधन संचालनालय, हैदराबाद यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर खाण योजना सादर करेल.

प्रमाणे खाण विकास आणि उत्पादन कराराच्या वेळी खनिज राखीव किमतीची 0.50 टक्के रक्कम कामगिरी सुरक्षा बँक हमी म्हणून दिली जाईल.

भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून पर्यावरण प्रमाणपत्र प्राप्त केले जाईल. एवढेच नाही तर  69.39 हेक्टर कुरणासाठी महसूल विभागाकडून एनओसी घेण्यात येणार आहे.

नक्की वाचा:माफक गुंतवणुकीतून सुरू करता येणारा व्यवसाय! थोडी गुंतवणूक,जास्त नफा आणि सदैव मागणी

English Summary: the big stock find of uranium in khandela area in rajasthan
Published on: 27 June 2022, 11:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)