नोकरी मागे न लागता कुठला तरी व्यवसाय उभा करून त्यामध्ये योग्य नियोजन, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आर्थिक प्रगती करता येते. तसे पाहायला गेले तर व्यवसायाच्या निरनिराळ्या कल्पना अनेकांच्या डोक्यात असतात.
परंतु नेमका कोणता व्यवसाय करावा? या बाबतीत बऱ्याच जणांचा गोंधळ होतो. तरी यामधून कुठल्यातरी व्यवसायाचे निवड केली तरी भांडवल हा सगळ्यात मोठा प्रश्न बऱ्याच जणांना उभा राहतो. त्यामुळे मनामध्ये अगदी सहजपणे येतेकी जर कमीत कमी भांडवल गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवता येण्यासारखा एखादा व्यवसाय करता आला तर?
असाच विचार जर तुम्ही देखील करत असाल तर या लेखामध्ये तुमच्यासाठी एक एक्सलंट अशी व्यवसायिक कल्पना दिली आहे. ती म्हणजे स्टेट बँकेत सोबत तुम्हाला करता येईल अशा कल्पनेबद्दल माहितीदेण्यात आली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएम फ्रेंचायसी(Atm Franchise Of Sbi)
एसबीआय एटीएम फ्रॅंचाईजी घेऊन तुम्ही नोकरी पेक्षा जास्त कमाई करू शकता किंवा नोकरी करता करता सुद्धा तुम्हाला या व्यवसायातून चांगला उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो. यासाठी तुम्हाला माहीत असले पाहिजे की कोणत्याही बँकेचे एटीएम हे बँकेद्वारे स्थापन केले जात नाही.
अशा बँकांचे एटीएम उभारण्यासाठी वेगळी कंपनी असते जी फ्रॅंचाईजी अंतर्गत एटीएम स्थापित करते. अशा कंपन्यांना बँका कॉन्ट्रॅक्ट देतात आणि ठीकठिकाणी एटीएम बसवण्याचे काम करतात. ही प्रक्रिया कशी चालते याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
एसबीआय एटीएम फ्रेंचायसी कसी मिळवायची?
1- यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे 50 ते 80 चौरस फूट जागा असणे आवश्यक आहे.
2- तसेच तुम्ही ज्या ठिकाणी एटीएम स्थापित करणार आहात त्या एटीएम पासून इतर एटीएम चे अंतर किमान 100 मीटर असावी.
3- ज्या ठिकाणी तुम्ही एटीएम स्थापन करणार आहात ती जागा चांगल्या कॉर्नर किंवा तळमजल्यावर असावी.
4- वीज पुरवठा हा सातत्याने व 24 तास असावा. तसेच एक केवी हे वीज कनेक्शन बंधनकारक आहे.
5- कमीत कमी तुम्ही स्थापन करत असलेल्या एटीएमची क्षमता दररोज तीनशे ट्रांजेक्शन ची असली पाहिजे.
6- ज्या ठिकाणी तुम्ही एटीएम स्थापन करणार आहात अशा जागेवर काँक्रीटचे छत असावे.
7- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे V-SAT स्थापन करण्यासाठी सोसायटी किंवा प्राधिकरणाचे एनओसी असणे अनिवार्य आहे.
यासाठी अर्ज कसा करावा? (process Of Application)
जर तुम्हाला एसबीआय एटीएम फ्रेंचायसी घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही अशी फ्रॅंचाईजी प्रदान करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन त्या माध्यमातून अर्ज करू शकतात. जरा भारताचा विचार केला तर भारतामध्ये टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएम यांच्याकडे एटीएम बसवण्याचा करार आहे.
एसबीआय एटीएम फ्रॅंचाईजी घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे (Nesessary Document)
1- आयडी प्रूफ म्हणून तुमच्या आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड इत्यादी देऊ शकतात.
2- ॲड्रेस प्रूफ म्हणून रेशनकार्ड किंवा विज बिल
3- बँकेचे खाते पुस्तक
4- पासपोर्ट साईज फोटो, तुमचा ईमेल आयडी आणि फोन नंबर व इतर कागदपत्रे
5- जीएसटी क्रमांक
6- आवश्यक आर्थिक दस्तऐवज
किती कमाई करता येते?(How Much Get Imcome)
या माध्यमातून प्रत्येक रोख व्यवहारावर 8 रुपये आणि नोन कॅश ट्रांजेक्शनवर दोन रुपये मिळतात. तसेच गुंतवणुकीवर वार्षिक रिटर्न हा तीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत आहे.
या बाबीचे उदाहरणच द्यायचे राहिले तर जर तुमच्या एटीएम मधून दररोज 250 ट्रांजेक्शन होत असतील व त्यातील 65 टक्के रोख आणि पस्तीस टक्के नोन कॅश व्यवहार होत असेल तर तुमचे मासिक उत्पन्न 45 हजार रुपयांच्या जवळपास असेल.(स्रोत-times now marathi)
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:तज्ञांचे मत:जून महिन्यातील कपाशीची लागवड करेल गुलाबी बोंड आळीच्या प्रादुर्भावास अटकाव
Published on: 18 May 2022, 11:49 IST