Others News

भारतीय पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या बचत योजना चालवते. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून लोकांना चांगला परतावा मिळत आहे. त्यामुळे लोक पोस्ट ऑफिस स्कीममध्ये पैसे गुंतवतात.

Updated on 01 September, 2022 4:08 PM IST

भारतीय पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या बचत योजना चालवते. पोस्ट ऑफिसच्या (post office) योजनांमध्ये गुंतवणूक करून लोकांना चांगला परतावा मिळत आहे. त्यामुळे लोक पोस्ट ऑफिस स्कीममध्ये पैसे गुंतवतात.

तुम्हाला सुरक्षित आणि उत्तम परतावा मिळत असलेल्या योजनांमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर ही योजना तुमच्यासाठी महत्वाची आहे. ग्राम सुरक्षायोजनेत तुम्ही दररोज फक्त 50 रुपयांची बचत करून 35 लाख रुपयांचा परतावा मिळवू शकता.

पात्रता

ग्राम सुरक्षा योजना (Village Security Scheme) ही ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना कार्यक्रमाचा एक भाग आहे. ही विमा पॉलिसी 1995 मध्ये देशातील ग्रामीण लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. 19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील व्यक्ती ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकतात.

या योजनेत 10 हजार रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. प्रीमियम भरण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकता.

सरकारच्या 'या' योजनेत दररोज जमा करा फक्त 233 रुपये; 17 लाख रुपयांचा मिळणार लाभ

परतावा

ग्राम सुरक्षा योजनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत दर महिन्याला 1,515 रुपये म्हणजेच दररोज केवळ 50 रुपये गुंतवले तर त्याला 35 लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळू शकतो. तुम्ही वयाच्या 19 व्या वर्षी ग्राम सुरक्षा योजना खरेदी केल्यास, 55 वर्षापर्यंत तुम्हाला 1,515 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

पशुपालकांनो सावधान! पुणे जिल्ह्यानंतर 'या' जिल्ह्यात 109 जनावरांना लंपी आजाराची लागण

35 लाख असे मिळतील

जर तुम्ही वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत ही योजना घेतली तर तुम्हाला दरमहा 1463 रुपये आणि 60 वर्षांपर्यंत तुम्हाला दरमहा 1411 रुपये द्यावे लागतील. तुमचा प्रीमियम चुकल्यास, तुम्ही तो ३० दिवसांच्या आत जमा करू शकता.

योजनेचा परतावा आपण पाहिला तर, गुंतवणूकदाराला 55 वर्षांच्या गुंतवणुकीवर 31.60 लाख रुपये, 58 वर्षांच्या गुंतवणुकीवर 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांच्या गुंतवणुकीवर 34.60 लाख रुपयांचा मॅच्युरिटी लाभ दिला जातो.

महत्वाच्या बातम्या 
'एकरकमी FRP घेतल्याशिवाय राज्यातला एकही कारखाना सुरु होवू देणार नाही'
मोठी बातमी: राज्यात 15 सप्टेंबरपासून जम्बो भरती; या विभागात 78000 पदे भरणार
ठरलं! पीएम किसान योजनेचा हप्ता 'या' तारखेला खात्यात जमा होणार

English Summary: Post Office Plans investment
Published on: 01 September 2022, 04:01 IST