पोस्ट ऑफिस ची कामे म्हटले म्हणजे डोळ्यासमोर येते पत्र शिवाय काही वस्तू पोचवणे हे होय. परंतु आता कालानुरूप पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून असंख्य प्रकारच्या गुंतवणूक योजना तर चालवल्या जातातच परंतु खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कामांचा समावेश पोस्ट ऑफिस च्या कार्यकक्षेत करण्यात आला आहे.
आता भारताच्या पोस्ट ऑफिस नेटवर्कचा विचार केला तर हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. भारतामध्ये दीड लाखांच्या वर पोस्ट ऑफिस असून तरीही भारतामध्ये अशी बरीच दुर्गम ठिकाणी आहेत त्याठिकाणी पोस्ट ऑफिस ची सुविधा पोहोचणे कठीण आहे.
या समस्येवर मात करता यावी यासाठी भारतीय टपाल विभागाने भारतीय पोस्ट ऑफिस फ्रेंचायसी योजना सुरु केली असून या माध्यमातून तुम्हीच देखील स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. या लेखामध्ये आपण या बाबत माहिती घेऊ.
पोस्ट ऑफिस सोबत व्यवसायिक संधी
या योजनेचे सर्वात महत्त्वाची आणि फायद्याची बाजू असलेली गोष्ट म्हणजे तुम्ही अगदी कमीत कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकतात व चांगला नफा देखील मिळू शकतात. अवघे पाच हजार रुपये गुंतवणूक करून तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या फ्रॅंचाईजी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
याबाबतची सविस्तर माहिती इंडियन पोस्ट ऑफिसचा संकेतस्थळावर दिली आहे, या माहितीनुसार या मध्ये दोन प्रकारच्या फ्रेंचायसी पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये पहिला पर्याय म्हणजे फ्रेंचायसी आउटलेट सुरू करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे पोस्टल एजंट बनणे हा होय. भारतामध्ये अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे टपाल सेवेची खूप मागणी असते परंतु काही कारणास्तव पोस्ट ऑफिस उघडणे अशा ठिकाणी शक्य नसते.
अशा ठिकाणी फ्रेंचायसी घेऊन आउटलेट उघडता येतात. तसेच आपण बघितले की दुसरा पर्याय हा पोस्टल एजंट चा असून यामध्ये ग्रामीण आणि शहरी दोन विभागात टपाल तिकिटे तसेच स्टेशनरी विकून पैसा मिळवता येऊ शकतो.
यासाठी आवश्यक पात्रता
1- कोणताही भारतीय नागरिक ही पोस्ट ऑफिसची फ्रेंचायसी घेऊ शकतो.
2- यामध्ये अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्ष असणे आवश्यक आहे.
3- संबंधित व्यक्ती ही आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून आठवी उत्तीर्ण असलेली व्यक्ती पोस्ट ऑफिस फ्रेंचायसी उघडू शकते.
4- यासाठी पाच हजार रुपये सिक्युरिटी म्हणून जमा करावे लागणार आहेत. यामध्ये तुम्ही जसे काम कराल त्या कामानुरूप तुम्हाला टपाल विभाग कमिशन देईल.
5- तुम्ही राहता त्या ठिकाणाहून जर पोस्ट ऑफिस खूप दूर असेल व पोस्ट ऑफिसच्या सेवांना त्याठिकाणी मागणी असेल तर तुम्ही कमिशन च्या माध्यमातून चांगले पैसे मिळवू शकतात. या साठी अर्ज करायचा असेल तर याची लिंक इंडिया पोस्ट ऑफिस च्या संकेतस्थळावर दिली आहे.
या लिंक वर जाऊन तुम्ही पोस्ट ऑफिस फ्रेंचायसी योजनेचा फॉर्म डाउनलोड करू शकता व फॉर्म भरून सबमिट करावा लागतो.
महत्वाच्या बातम्या
Published on: 22 May 2022, 08:51 IST