Petrol-Diesel Prices: रशिया आणि युक्रेन युद्धापासून देशात महागाई (inflation) गगनाला भिडत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel) किमती वाढल्यामुळे सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मात्र देशात इंधनाच्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने (Central Govt) पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. आज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. आज शुक्रवारी तेल कंपन्यांनी सलग ३ महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.
राज्यांमध्ये पेट्रोलचे वेगवेगळे दर
आज राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
शेतकऱ्यांचा खर्च होणार कमी! 50 किलो DAP च्या बरोबरीने काम करणार 500 मिली ची बाटली; उत्पन्न वाढणार
रोज सकाळी नवीन दर जाहीर होतात
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.
ठरलं तर! केंद्र सरकार या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार 12वा हफ्ता
एसएमएसद्वारे जाणून घ्या पेट्रोल डिझेलची किंमत
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत अपडेट केली जाते. पेट्रोल डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित केले जातात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल कंपन्या शहरात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर देतात.
पेट्रोल डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते, यासाठी इंडियन ऑइलच्या ग्राहकांना आरएसपी कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. अशा प्रकारे तुम्ही पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकता.
महत्वाच्या बातम्या:
पांढऱ्या अळीपासून पिकांचे असे करा संरक्षण; जाणून घ्या उपाय
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; अविवाहित महिलाही करू शकतात गर्भपात...
Published on: 30 September 2022, 09:42 IST