Others News

छोट्या उद्योजकांचा विकास होण्यासाठी केंद्र सरकारने मुद्रा लोन योजना राबवत आहे. छोटे व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी अत्यंत उपयोगी असलेली सरकारची मुद्रा लोन योजना खूप लोकप्रिय झाली आहे.

Updated on 29 March, 2021 3:21 PM IST

छोट्या उद्योजकांचा विकास होण्यासाठी केंद्र सरकारने मुद्रा लोन योजना राबवत आहे. छोटे व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी अत्यंत उपयोगी असलेली सरकारची मुद्रा लोन योजना खूप लोकप्रिय झाली आहे. अनेक उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी या योजनेचा लाभ घेतला आहे. छोट्या व्यावसायिकांना ५० हजार रुपयांचे कर्ज या योजनेतून सहज मिळते.  दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय स्टेट बँक (SBI) देशातील छोटे व्यापाऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत दहा मिनीटात १० हजार रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पुरवत आहे.

कोरोना सारख्या संकटात एसबीआयकडून मुद्रा लोन स्कीम (Mudra Loan Scheme) च्या मार्फत कर्ज दिले जात असल्याने या काळात छोट्या व्यावसायिकांना खूप फायदा होणार आहे. या योजनेमुळे व्यापारी/ व्यासायिक आपला व्यवसाय वाढवू शकतील. दरम्यान एसबीआयने आपल्या ट्विटर अंकाऊटवरून या योजनेविषयी खूप महत्वाची माहिती दिली आहे. मुद्रा लोन योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारे उमेदवार घरी बसून मुद्रा लोनसाठी अर्ज करु शकतील आणि मोजून ५९ मिनीटात कर्ज मिळवू शकतील. 

हेही वाचा:पाच राज्यांतील निवडणुकांमुळे तूर आयातीला लवकर परवानगी

केंद्र सरकारच्या या मुद्रा योजनेतून छोटे- मोटे व्यापारी व्यावसायिक आणि  मजुरी करणारे मजूरही  सोप्या अटींवर कर्ज मिळवू शकतील. या योजनेच्या माध्यमातून चहा आणि स्नॅक्सचे दुकान सुरू करण्यासाठी १० लाख रुपयांचे कर्ज बँकेमार्फत दिले जाते. दरम्यान एसबीआयमार्फत देण्यात येणाऱ्या कर्जावर ८.५ टक्के व्याज आकारले जाते.

काय आहे मुद्रा योजना:

Micro Units Development and Refinance Agency  (MUDRA)  पासून निर्मित करण्यात आली आहे. ही मुख्य योजना लहान आणि कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे आहे.

पंतप्रधानमंत्री  मुद्रा योजनेसाठी  कोणते कागदपत्र लागतात

कोणताही भारतीय नागरिक मुद्रा लोनसाठी अर्ज करु शकतो.  परंतु मुद्रा योजनेसाठी  महिला आणि एससी, एसटी उमेदवारांना प्राधन्यता दिले जाते.  एसबीआय मार्फत लोन घेण्यासाठी आपल्याकडे  ओळखपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, बँकेचे स्टेंटमेट, फोटोग्राफ, कोटेशन्स बिझनेज ओळख पत्रआणि पत्ता इत्यादी कागदपत्रांची गरज असते. यासह जीएसटी आयडेंफिकेशन नंबर, आयकर विभाग रिटर्नची माहिती द्यावी लागते. दरम्यान आपण एसबीआयच्या संकेतस्थळावर जाऊन आपण अर्ज करु शकतात.

English Summary: Mudra Loan Scheme - SBI Best Offer , Apply from home
Published on: 17 August 2020, 08:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)