Others News

तुम्हाला जर जास्त पैसे कमवायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका मस्त व्यवसायाची कल्पना सांगणार आहोत, ज्याची सुरुवात करून तुम्ही घरबसल्या लाखो रुपये कमवू शकता. आजच्या काळात खारट( नमकीन ) पदार्थांच्या खूप मागणी आहे.

Updated on 01 July, 2022 5:51 PM IST

तुम्हाला जर जास्त पैसे कमवायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका मस्त व्यवसायाची कल्पना सांगणार आहोत, ज्याची सुरुवात करून तुम्ही घरबसल्या लाखो रुपये कमवू शकता. आजच्या काळात खारट( नमकीन ) पदार्थांच्या खूप मागणी आहे.

लहानांपासून मोठ्यापर्यंत नमकीन खाण्याचा छंदही जडला आहे, त्यामुळे नमकीन बनवण्याचा व्यवसाय सुरू केल्यास मोठा फायदा होईल.

चला तर मग जाणून घेऊया नमकीनचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो, तसेच त्यात कोणते घटक आवश्यक आहेत.

नमकीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला या लेखातील काही गोष्टी काळजीपूर्वक वाचाव्या लागतील. व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी सविस्तर वाचा.

नक्की वाचा:Profitable Bussiness!कमी जागेत,कमी गुंतवणुकीत मिळवा जास्त नफा, सुरु करा हा व्यवसाय अन मिळवा चांगला नफा

1) गुंतवणुकीची रक्कम :-

 नमकीनचा  व्यवसाय सुरू करायचा असेल तर सर्वप्रथम तुमच्याकडे जमिनीची चांगली व्यवस्था असावी. यानंतर नमकीन तयार करण्यासाठी नमकीन मशीन असावे.

नमकीन बनवण्याच्या मशीन ची किंमत सुमारे 40 ते 90 हजार आहे, त्यामुळे तुम्ही नमकीन मशीन ने व्यवसाय सुरू केल्यास 2 ते 6 लाख रुपये खर्च होतील.

2) जमिनीची गरज :-

नमकीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जमीन लागेल. जर तुम्हाला व्यवसायाची सुरुवात छोट्या स्तरातून करायची असेल, तर तुम्ही तुमच्या घरातील एका छोट्या खोलीतूनही सुरुवात करू शकतात

आणि जर तुम्ही मोठ्या स्तरापासून सुरुवात केली तर त्यासाठी तुम्हाला बाहेर कुठे तरी सुमारे 300 स्क्वेअर फुट जागा खरेदी करावी लागेल.

3) कर्मचारी आणि शक्ती आवश्यकता :-

 नमकीन च्या व्यवसायासाठी कर्मचाऱ्यांची गरज आहे. ज्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 कर्मचारी मिळू शकतात. तर नमकीन व्यवसायात नमकीन बनवण्यासाठी यंत्र चालवण्यासाठी वीज लागते, ज्यामध्ये तुम्हाला 5 ते 8 किलोवॅटचे कनेक्शन घ्यावे लागेल.

नक्की वाचा:टरबूज शेती: टरबूज लागवड करतात तर त्यावर प्रक्रिया करून 'हे'पदार्थ बनवले आणि विकले तर मिळवाल बंपर नफा

4) कच्चामाल आणि मशीन कोठे खरेदी करावी :-

 या व्यवसायात तुम्हाला नमकीन बनवण्यासाठी कच्चामाल लागेल. कच्चामाल जसे बेसन, मोहरीचे तेल, मिरची, मसाले इत्यादी जे तुम्ही जवळपासच्या कोणत्याही मार्केटमधून खरेदी करू शकता.

दुसरीकडे, जर आपण मशीन खरेदी बद्दल बोललो, तर आजकाल मोठ्या कंपन्या नमकीन बनविण्याचे अनेक मशीन तयार करत आहेत. जे तुम्ही बाजारातूनही सहज खरेदी करू शकता.

5) नोंदणी आणि परवाना:-

 जर तुम्ही व्यवसायाची सुरुवात अल्पप्रमाणात केली असेल तर तुम्हाला नोंदणी आणि परवान्याची गरज भासणार नाही. जर तुम्ही मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करत असाल,

तर त्यासाठी तुम्हाला खूपच नोंदणी आणि परवाना लागेल. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही गोष्टी कराव्या लागतील.

1) नमकीन च्या व्यवसायासाठी प्रथम तुम्हाला एमएसएमई अंतर्गत नोंदणी करावी लागेल.

2) यानंतर खारट( नमकीन)पदार्थ बाजारात विकण्यासाठी FSSAI फूड लायसन्स द्यावा लागेल. 

3)यानंतर तुम्हाला व्यवसायासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून एनओसी द्यावी लागेल आणि कारखान्याचा परवानाही घ्यावा लागेल.

4) या व्यवसायासाठी जीएसटी नोंदणीही करावी लागणार आहे.

5) जर तुम्हाला नमकीन उत्पादन तुमच्या स्वतःच्या ब्रँड नावाने बाजारात विकायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला ट्रेडमार्क नोंदणी देखील करावी लागेल.    

नक्की वाचा:Top 5 Agri Bussiness Idea:हे 5 शेतीशी निगडित व्यवसाय शेती सोबत देतील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्

English Summary: making namkin bussiness is so profitable bussiness and give more income
Published on: 01 July 2022, 05:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)