Others News

चंदन शेती हा व्यवसाय नवीन नाही परंतु चंदन शेतीसाठी १० ते १२ वर्षाचा कालावधी लागतो, ही शेती वेळखाऊ आहे परंतु अतिशय नफा देणारी सुद्धा आहे. चंदन शेती व्यवसाय तुम्हाला नक्कीच उत्पन्न मिळवून देईल.

Updated on 26 April, 2022 2:40 PM IST

चंदन शेती हा व्यवसाय नवीन नाही परंतु चंदन शेतीसाठी १० ते १२ वर्षाचा कालावधी लागतो, ही शेती वेळखाऊ आहे परंतु अतिशय नफा देणारी सुद्धा आहे. चंदन शेती व्यवसाय तुम्हाला नक्कीच उत्पन्न मिळवून देईल. चंदनाच्या शेतीची सर्वात चांगली गोष्ट ही आहे की, याची मागणी आपल्या देशासोबतच परदेशातही मोठ्या प्रमाणात आहे.

चंदनाच्या गाभ्यापासून तेलाची निर्मिती होते. एका झाडात १५ ते ५० किलो इतका गाभा तयार होतो. एकरी २५० चंदनाच्या रोपांची व्यवस्थित लागवड होते, साधारण एका एकरात ४५०० किलो पर्यंत गाभा मिळू शकतॊ. तो गाभा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी मुक्त बाजारात साधारण १४०००/- प्रति किलोने विकू शकतात. खात्रीशीर ग्राहक हवा असेल तर शेतकरी कर्नाटक राज्य सरकारला तो ६५००/- प्रति किलोने विकू शकतात.

चंदनाच्या शेतीवर तुम्ही जितका पैसा खर्च करता त्यापेक्षा अनेक पटीने तुम्हाला नफा मिळतो. यासाठी लागणारा खर्च जवळपास प्रती एकर ४ लाख रूपये असतो आणि १ कोटी रूपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो.

ग्रामीण भागातील तरुण शहरात नोकरीच्या शोधात जातात परंतु त्यांनी नोकरी ऐवजी चंदन शेती करून उद्योग केल्यास चांगला नफा काढू शकतात. माहितीनुसार, चंदनाच्या झाडांची दोन पद्धतीने लागवड करता येते, पहिली आहे ऑरगॅनिक पद्धत आणि दुसरी आहे पारंपरिक पद्धत. ऑरगॅनिक पद्धतीने चंदनाची लागवड करण्यासाठी जवळपास १० ते १५ वर्ष लागतात आणि दुसरीकडे पारंपरिक पद्धतीने २० ते २५ वर्षं इतका वेळ लागतो. चंदन वृक्षाची लागवड करताना दोन रांगेमध्ये किमान १० फूट अंतर असते.

या जागेत हरभरा, उडीद, मूग, भुईमूग अशी आंतरपिके घेतल्यास लागवडीस पोषक वातावरण मिळून चंदनाची वाढ जोमदार होते. आंतरपीक घेताना जमीन नांगरणी/वखरणी केली जाते. शेताला पाणी, खते दिली जातात. कडधान्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. नत्राचे प्रमाण वाढते. या सर्वांचा चंदन वाढीस फायदा होतो. चंदनाची रोपं ही इतर रोपांच्या तुलनेत महाग मिळतात. पण जर एकत्र रोपं खरेदी केल्यास स्वस्तात रोपे मिळू शकतात. मग तुम्हीही व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर चंदनाच्या शेतीच्या पर्यायाबाबत नक्की विचार करा.

महत्वाच्या बातम्या
क्रिकेटनंतर कडकनाथ! धोनीचे पोल्ट्री व्यवसायात पदार्पण, जाणून घेऊ कडकनाथ कोंबडीचे वैशिष्ट्ये
कृषी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थेत शेतीमध्ये क्रांती, मुलांनी फुलवली शेती..

English Summary: Make a profit of up to 60 lakhs by investing one lakh, learn sandalwood farming
Published on: 26 April 2022, 02:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)