तुम्ही सुरक्षित ठिकाणी गुंतवणूकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बातमी महत्वाची आहे. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस योजना (post office scheme) एक उत्तम पर्याय ठरू शकते.
या योजनेत गुंतवणूक केल्यास 5.8 टक्के दराने व्याज परतावा दिला जातो. आपण पोस्ट ऑफिसच्या (post office) पोस्ट आवर्ती ठेव योजनेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. या योजनेत गुंतवणूक करण्यास अनेक लोक पसंती दाखवतात.
तुम्हालाही आर्थिक तणाव जाणवत आहे? तर महत्वाच्या टिप्स करा फॉलो
पात्रता
18 वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक 'पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेत' (Post Office Recurring Deposit Scheme) अर्ज करून गुंतवणूक सुरू करू शकता. तुम्ही या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये 100 रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. या योजनेत गुंतवलेल्या पैश्यावर दर तिसऱ्या महिन्याला तुमच्या खात्यात व्याज परतावा जमा केला जाईल.
या योजनेत (scheme) मासिक फक्त 10 हजार रुपये गुंतवून तुम्ही दीर्घ काळात 16 लाख रुपये परतावा कमवू शकतात. तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेत संपूर्ण दहा वर्षांसाठी दरमहा दहा हजार रुपये गुंतवावे लागतील.
शेतकऱ्यांनो चांगल्या उत्पादनासाठी 'या' खताचा करा वापर; होणार लाखोंमध्ये कमाई
16 लाख रुपयांचा परतावा
दहा वर्षांसाठी नियमित मासिक गुंतवणूक करून 16 लाख रुपयांचा परतावा सहज मिळेल. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposits) स्कीममध्ये तुम्हाला नियमितपणे गुंतवणूक करावी लागेल, ह्यातून तुमची चांगली बचत ही होईल.
महत्वाच्या बातम्या
आनंदाची बातमी! 'या' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 900 कोटींचा लाभ
शेतकऱ्यांसाठी उद्योजक बनण्याची मोठी संधी; 35% अनुदानावर घरबसल्या सुरू करा 'हे' व्यवसाय
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची कमाल; 'रेड बनाना' केळीचा प्रयोग यशस्वी, मिळतोय उच्चांक दर
Published on: 08 September 2022, 04:22 IST