Others News

आपल्या घरात अनेकदा लाल मुंग्या त्रासदायक ठरतात, यामुळे आपल्या किचनमध्ये किंवा इतर घरात त्या आपल्याला चावा घेत असतात. यामुळे मोठी अडचण निर्माण होते. त्या दिसायला छोट्या असल्या तरी त्या नाकीनऊ आणतात. अनेकदा घरातील कानाकोपऱ्यात मुंग्या दिसतात. उन्हाळा असो किंवा पावसाळा असो या मुंग्या अनेकदा त्रासदायकच ठरतात.

Updated on 20 June, 2022 3:25 PM IST

आपल्या घरात अनेकदा लाल मुंग्या त्रासदायक ठरतात, यामुळे आपल्या किचनमध्ये किंवा इतर घरात त्या आपल्याला चावा घेत असतात. यामुळे मोठी अडचण निर्माण होते. त्या दिसायला छोट्या असल्या तरी त्या नाकीनऊ आणतात. अनेकदा घरातील कानाकोपऱ्यात मुंग्या दिसतात. उन्हाळा असो किंवा पावसाळा असो या मुंग्या अनेकदा त्रासदायकच ठरतात. गोड पदार्थांवर मुंग्या लागलेल्या असतात. या मुंग्या पळवून लावण्यासाठी मात्र अनेक उपाय आहेत.

घरगुती उपाय करून तुम्ही या मुंग्या पळवून लावू शकता, यामध्ये तुम्ही मुंग्यांना घरातून पळवून लावण्यासाठी दालचीनीही फायदेशीर ठरते. यासाठी दालचीनी आणि लवंग एकत्र मुंग्या लागतात तिथे ठेवा. घरात जिथे जिथे मुंग्यांची घरं आहेत तिथे दालचीनी पावडर आणि लवंग ठेवा. तुम्ही दालचीनी आणि लवंगच्या एसेंशिअल ऑइलचाही वापर करू शकता, यामुळे या मुंग्या पळून जातील.

तसेच मुंग्या असतील तिथे लिंबू पिळा किंवा लिंबाची साल ठेवा. लादी पुसताना त्या पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. फरशीवर लिंबाचा सुगंध आला तर मुंग्या घाबरून पळून जातात. कडू आणि आंबट गोष्टींपासून मुंग्या दूर राहतात. यामुळे लिंबू देखील यासाठी फायदेशीर ठरते, मात्र ते केवळ एकदा न करता ते अनेकदा करावे लागेल.

भोपळ्याचा रस ठरला वरदान! अनेक रुग्णांना झाला फायदा, वाचा आश्चर्यजनक फायदे

काळ्या मिऱ्याचे पावडर किंवा काळ्या मिऱ्यांचे पाणी मुंग्यांवर शिंपडले तर मुंग्या घरातून गायब होतील. तसेच चॉक देखील यासाठी महत्वाचा ठरतो. चॉकमध्ये कॅल्शिअम कार्बोनेट असतं. जे मुंग्यांना पळवण्यासाठी फायदेशीर असतं. तुम्ही चॉक म्हणजेच खडूची पावडर करून मुंग्या ज्या ठिकाणी आहे तिथे टाका किंवा चॉक तिथे ठेवा. चॉकने रेषा आखली तर मुंग्यांसोबतच माकोडे, कीडेही दूर पळतात, यामुळे हे उपाय केल्यास मुंग्या तुमच्या घरात येणार नाहीत.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो थांबा!! राज्यात केवळ एक टक्केच पेरणी, पावसाअभावी पेरण्या थांबल्या...
किसानपुत्रांनी पाळला काळा दिवस, घरावर काळे झेंडे लावून केला सरकारचा निषेध
लसणाची एक पाकळी झोपताना उशीखाली नक्की ठेवा, आयुष्यात होतील मोठे बदल..

English Summary: House ants will disappear in five minutes, try these 5 home remedies ...
Published on: 20 June 2022, 03:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)