Others News

16 ऑक्टोबरला मंगळ ग्रह राशी परिवर्तन करून मिथुनमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे ‘महा दरिद्र योग’ तयार होत आहे. याचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असला तरीही चार राशींसाठी हा योग संकटे घेऊन येऊ शकतो. या राशी कोणत्या? जाणून घेऊया सविस्तर...

Updated on 10 October, 2022 6:06 PM IST

16 ऑक्टोबरला मंगळ ग्रह राशी परिवर्तन करून मिथुनमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे ‘महा दरिद्र योग’ तयार होत आहे. याचा प्रभाव सर्व राशींवर (zodiac signs) पडणार असला तरीही चार राशींसाठी हा योग संकटे घेऊन येऊ शकतो. या राशी कोणत्या? जाणून घेऊया सविस्तर...

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी ‘महा दरिद्र योग’ त्रासदायक ठरू शकतो. या काळात वृषभ राशीच्या संक्रमण कुंडलीच्या केंद्रस्थानी कोणताही शुभ ग्रह नसेल. तसेच वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र दुर्बल होऊन त्याचा अस्त होईल.

यामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक (Financial) नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. तसेच, यावेळी व्यवसाय संथ गतीने सुरु राहील. या काळात नवीन गुंतवणूक टाळण्याचा प्रयत्न करावा, त्याचबरोबर कोणालाही कर्ज देताना सर्व गोष्टींचा नीट विचार करून निर्णय घ्यावा.

जिल्ह्यात 'गाव तिथं डेअरी', सहकारी दूध संघाचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना होणार फायदा

सिंह

‘महा दरिद्र योग’ तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. त्याचबरोबर, या राशीचा स्वामी सूर्य देव १७ ऑक्टोबरला तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे या काळात या राशीच्या संक्रमण कुंडलीच्या केंद्रस्थानी कोणताही शुभ ग्रह नसेल.

त्याचवेळी, संपत्तीचे कारक मृत्यूच्या ठिकाणी स्थित असल्याने हा योग तयार होईल. म्हणूनच या राशीच्या लोकांनी या काळात खूप सावध राहण्याची गरज आहे. या दिवसांमध्ये जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात.

आज जागतिक मानसिक आरोग्य दिन; जाणून घ्या महत्वाच्या 'या' 6 गोष्टी

वृश्चिक

महा दरिद्र योग या राशींच्या लोकांसाठीही अशुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात या राशीचा स्वामी असलेला मंगळ ग्रह शत्रू राशीच्या मृत्यूच्या ठिकाणी स्थित असल्याने हा अशुभ योग तयार होत आहे.

त्याचबरोबर केतू ग्रहाची नववी राशी देखील अस्त होत असून संक्रमण कुंडलीच्या केंद्रस्थानी कोणताही शुभ ग्रह नसेल. त्यामुळे यावेळी काळजी घ्यावी. कोणतेही नवीन काम सुरू न करणे उत्तम ठरेल. तसेच या काळात व्यवहारात सावधगिरी बाळगावी.

कुंभ

महा दरिद्र योगामुळे कुंभ राशींच्या लोकांचेही नुकसान होऊ शकते. कारण या राशीचा स्वामी शनिदेव १२ व्या घरात विराजमान आहे. तसेच संक्रमण कुंडलीच्या केंद्रस्थानी कोणतेही ग्रह नाहीत.

भाग्य स्थानाचा स्वामी शुक्रदेव दुर्बल अवस्थेत आहे. त्याचबरोबर पितृदोष निर्माण होत असल्यामुळे या काळात या राशीच्या लोकांनी खूप सावध राहण्याची गरज आहे. यावेळी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांनो मोहरीच्या 'या' सुधारित वाणाची करा शेती; मिळेल दुप्पट फायदा
पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर; 7 लाख रुपयांचा होणार फायदा, फक्त हे एकच काम करा
पावसामुळे कापणी केलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास मिळणार भरपाई; 'या' टोल फ्री नंबरवर करा कॉल

English Summary: Horoscope October 16 people Taurus Leo worried
Published on: 10 October 2022, 05:59 IST