Others News

चांगल्या भविष्यासाठी प्रत्येकजण सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करतो. अशावेळी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या योजना फायदेशीर ठरू शकतात. पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत. ज्यातून चांगला परतावा मिळेल.

Updated on 22 September, 2022 9:56 AM IST

चांगल्या भविष्यासाठी प्रत्येकजण सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करतो. अशावेळी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या योजना फायदेशीर ठरू शकतात. पोस्ट ऑफिसच्या (post office) अशा अनेक योजना आहेत. ज्यातून चांगला परतावा मिळेल.

पोस्ट ऑफिसचा ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. याठिकाणी तुम्ही छोट्या गुंतवणुकीत चांगला फंड तयार करू शकता. ही योजना गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरेल.

कोरोनानंतर आपल्या सर्वांच्या मनात कुठेतरी सुरक्षित भविष्याची चिंता आहे. अशा वेळी तुम्ही सुरक्षित योजना शोधत असाल ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या ठिकाणी तुम्हाला बाजारातील चढ-उतारांना सामोरे जावे लागणार नाही आणि सुरक्षिततेच्या हमीसह एक चांगला फंड बनण्यास तयार होईल.

ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स (Rural Postal Life Insurance) या पोस्ट ऑफिसच्या योजनेत तुम्ही गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू आहे. कमी वेळेत छोट्या गुंतवणुकीत तुम्ही चांगला फंड तयार करू शकता.

सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; किती मिळतोय सोयबिनला बाजारभाव? जाणून घ्या

लाभार्थी

या योजनेचा लाभ 19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात. ही योजना पोस्टाच्या ग्रामीण पोस्टल जीवन विमा (Rural Postal Life Insurance) कार्यक्रमांतर्गत चालवली जाते. या योजनेअंतर्गत, किमान विमा रक्कम 10,000 रुपये आहे आणि कमाल विमा रक्कम 10 लाख रुपयांपर्यंत आहे. याठिकाणी गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकता.

गुंतवणूक इतकी करा

या पोस्ट ऑफिस योजनेची मॅच्युरिटी (Maturity) जास्तीत जास्त 80 वर्षांत आहे. या अंतर्गत तुम्ही 1,500 रुपयांच्या गुंतवणुकीसह 50 लाख रुपयांपर्यंतचा निधी तयार करू शकता.

यासाठी दररोज फक्त 50 रुपये गुंतवावे लागतील. 10 लाख रुपयांची किमान विमा रक्कम रु. 1,515, तसेच 58 वर्षे वयासाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षे वयाच्या व्यक्तीसाठी रु. 1,411 असेल.

रब्बी हंगामात आंतरपीक पद्धतीने करा शेती; मिळेल दुप्पट फायदा

सुविधा

या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर 4 वर्षांनीच तुम्हाला कर्जाची सुविधा मिळू शकते. याशिवाय, तुम्ही तुमचा नॉमिनी देखील येथे दाखल करू शकता. पॉलिसी घेतल्यानंतर धारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला पैसे दिले जातात.

नामनिर्देशित व्यक्तीच्या अनुपस्थितीत ते कायदेशीर वारसाला दिले जाते. जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडू शकता आणि याचा लाभ घेवू शकता.

महत्वाच्या बातम्या 
ऑक्टोबरमध्ये 'या' राशींचे नशीब ताऱ्यांसारखे चमकणार; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
शेतकरी मित्रांनो 12 व्या हप्त्याची स्थिति घरी बसून एका कॉलवर तपासा; जाणून घ्या
शेतकऱ्यांना शेती यंत्रे खरेदी करण्यासाठी मिळणार 80 टक्यांपर्यंत अनुदान; असा घ्या लाभ

English Summary: good profit investment 50 rupees Rural postal doing goods
Published on: 22 September 2022, 09:48 IST