Gold Price Today: देशात सध्या नवरात्रीचे दिवस (Navratri days) सुरु आहेत. तसेच दसरा आणि दिवाळीही काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या दिवसांत जर तुम्हीही सोने (Gold) आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण असून आणि चांदी (Silver) त्यांच्या उच्चांक दरापासून स्वस्त मिळत आहे.
सध्या भारतीय सराफा बाजारात (Bullion Market) सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. अशा स्थितीत मंगळवारीही सोने घसरणीसह व्यवहार करत आहे.
विक्रमी उच्च किमतीच्या विरुद्ध किंमत
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या किमतीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा भाव 55,400 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला होता. आज बाजारात सोन्याचा दर 49313 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. जर तुम्ही आजच्या किमतीची त्याच्या सर्वकालीन उच्च दराशी तुलना केली तर तुम्हाला दिसेल की सोने 9600 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत तुटले आहे.
सोन्याची फ्युचर्स किंमत
मंगळवारी सोन्याच्या फ्युचर किमतीत घसरण झाली आहे. मात्र, ही घट अत्यंत किरकोळ आहे. मंगळवारी, MCX वर सकाळच्या व्यवहारात ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 20 रुपयांनी घसरून 49,130 रुपयांवर आला. मागील व्यवहारात सोन्याचा भाव ४९,१५० रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. या दरम्यान 4569 लॉटसाठी व्यापार झाला.
24 कॅरेट सोन्याची किंमत
सराफा बाजारात 22 कॅरेटसह 24 कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. मंगळवारी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 230 रुपयांनी घसरून 49,970 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. मागील व्यवहारात सोन्याचा भाव 50,200 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता.
बाजारात या भाज्यांना आहे खूप मागणी; 1200-1300 रुपये किलोने होतेय विक्री
मिस्ड कॉल देऊन सोन्याची नवीनतम किंमत जाणून घ्या
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासोबतच वारंवार येणाऱ्या अपडेट्सच्या माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.
महत्वाच्या बातम्या:
राज्यात लम्पीचा धुमाकूळ! 735 जनावरांचा मृत्यू
कच्च्या तेलाचे दर घसरले! प्रति बॅरल 76.77 डॉलरवर; पहा पेट्रोल डिझेलचे नवीनतम दर...
Published on: 27 September 2022, 10:59 IST