नुकताच केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेमध्ये एक मोठा बदल केला आहे. रेशन कार्ड धारकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गव्हाचा कोटा कमी करून तांदळाचा कोटा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी रेशन कार्ड धारकांना पूर्वीच्य तुलनेत कमी गहू मिळणार. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची निर्मिती ही कोरोना काळात सुरु करण्यात आली होती.
या योजनेद्वारे ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड आहे त्या नागरिकांना मोफत तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ प्रति व्यक्ती दिला जातो. मात्र ज्या नागरिकांकडे रेशनकार्ड नाही त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. अनेक राज्यांत तसेच काही केंद्र शासित प्रदेशांत हा बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मे ते सप्टेंबरपर्यंत वाटप करण्यात येणारा गव्हाचा कोटा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेअंतर्गत बिहार, केरळ आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांना मोफत वितरणासाठी गहू दिला जाणार नाही. तसेच दिल्ली, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील गव्हाचा कोटा कमी करण्यात आला आहे. मात्र उरलेल्या 25 राज्यांच्या कोट्यात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.
शेतकरी पुत्राचा नादच खुळा..! थेट बैलगाडीतून काढली वरात
केंद्राने राज्यांना दिलेल्या माहितीनुसार, 'मे ते सप्टेंबरपर्यंत सर्व 36 राज्ये/केंद्र शासित प्रदेशांसाठी तांदूळ आणि गव्हाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत वाटपात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.' तसेच, गव्हाच्या कमी झालेल्या कोट्याची भरपाई तांदूळातून केली जाईल, असे अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
पावसासंबंधी निसर्गाचे संकेत कसे ओळखायचे? या विषयी पंजाबराव डख यांनी सांगितली महत्त्वाची माहिती...
भन्नाट आँफर : तिसरे बाळ जन्माला घाला आणि मिळवा ११ लाख रुपये
Published on: 09 May 2022, 04:55 IST