महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट झाली आहे. यावेळी एलपीजी सिलिंडरचे (LPG Gas cylinder) दर 91.5 रुपयांनी कमी झाले आहेत.
इंडियन ऑइलने (Indian Oil) 1 सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या किमतींनुसार, राजधानी दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 91.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून सिलिंडरसाठी फक्त 1885 रुपये मोजावे लागणार आहेत.
एलआयसीची 'ही' योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; फक्त 29 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतात 4 लाख रुपये
एलपीजी गॅस सिलिंडर दर
राजधानी दिल्लीत 1976.50 ऐवजी 1885 रुपये मोजावे लागणार आहेत.
कोलकात्यात 2095.50 ऐवजी 1995.50 रुपये मोजावे लागणार आहेत.
मुंबईत 1936.50 ऐवजी 1844 रुपये मोजावे लागणार आहेत.
चेन्नईमध्ये 2141 ऐवजी 2045 रुपये मोजावे लागणार आहेत.
दिल्लीत 14.2 किलोचा गॅस सिलिंडर 1053 रुपयांना मिळत आहे.
अरे व्वा! आता फक्त 40 हजारांत खरेदी करता येणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या वैशिष्ट्ये
यावरून आपल्या लक्षात येत आहे की व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) किमतीत सलग पाचव्यांदा घसरण झाली आहे. 19 मे 2022 रोजी 2354 रुपयांच्या विक्रमी किमतीवर पोहोचलेल्या गॅस सिलेंडरची किंमत 1 जून रोजी 2219 रुपये होती. महिनाभरानंतर सिलिंडरची किंमत 98 रुपयांनी कमी होऊन ती 2021 रुपये झाली.
6 जुलै रोजी तेल कंपन्यांनी या सिलेंडरची किंमत (price cylinder)2012.50 रुपये केली. 1 ऑगस्टपासून हा सिलेंडर 1976.50 रुपयांना मिळू लागला. आता 1 सप्टेंबरला याची किंमत 1885 झाली. सततच्या घसरणीमुळे महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या
एकाच दिवशी वाढलेल्या संपत्तीमुळे अदानी वरच्या क्रमांकावर गेले, आकडा वाचून डोळे होतील पांढरे
सरकार शेतकऱ्यांना देतंय वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन; तुम्ही सुद्धा 'या' योजनेचे होऊ शकता लाभार्थी
देशातील प्रथम शेती अवजाराचे ग्रीन सिस्टिम शोरूम बार्शीत सुरू, शेतकऱ्यांना होणार फायदा
Published on: 01 September 2022, 09:25 IST