Others News

या बँकेने अनेकजण चांगल्या भविष्यासाठी बँकेत गुंतवणूक करत असतात. यामधून बँक त्यांना चांगला परतावा देखील देतात. मात्र आता युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने एक दिलासादायक बातमी दिली आहे. या बँकेने जेष्ठ नागरिकांना 8.40 % व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated on 03 October, 2022 5:50 PM IST

या बँकेने अनेकजण चांगल्या भविष्यासाठी बँकेत गुंतवणूक करत असतात. यामधून बँक त्यांना चांगला परतावा देखील देतात. मात्र आता युनिटी स्मॉल फायनान्स बँक (bank) लिमिटेडने एक दिलासादायक बातमी दिली आहे. या बँकेने जेष्ठ नागरिकांना 8.40 % व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाने जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर हा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पेशल स्कीमचे नाव शगुन 501 असे आहे.

या स्पेशल एफडी स्कीममध्ये बँकेकडून रिटेल ग्राहकांना 7.90 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8.40 टक्के व्याज दिले जाईल. मात्र यामध्ये 31 ऑक्टोबरपर्यंतच गुंतवणूक करता येईल.

युनिटी बँकेने एक ट्विट करून म्हटले की, "यावेळचा दसरा आणि दिवाळी, युनिटी बँकेच्या 501दिवसांच्या FD सह शुभशकून सुरू करूयात. युनिटी बँकेच्या 501 दिवसांच्या FD वर मर्यादित कालावधीच्या ऑफरसह हा प्रसंग साजरा करा आणि 7.9% पीए पर्यंत कमवा. ज्येष्ठ नागरिक वार्षिक 8.4% पर्यंत कमाई मिळेल."

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत FD पेक्षा जास्त परतावा; घ्या असा लाभ

रेपो दर 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच RBI ने द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर आणला आहे. जो गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलले गेले आहे.

आहारात या 6 फळांचे सेवन करा; रक्ताच्या नसा साफ होतील, हार्ट अटॅकचा धोखाही टळेल

'या' बँकांनी देखील वाढवले ​FD चे दर

RBL बँक, Axis बँकांनी देखील FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर दर वाढवण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://theunitybank.com/

महत्वाच्या बातम्या 
शेतीकामासाठी सर्वोत्तम भारतातील टॉप 5 ट्रॅक्टर; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
शेतकऱ्यांनो लवंग, वेलची 'या' मसाला पिकांची शेती करून कमवा लाखों रुपये; जाणून घ्या
सामान्य गव्हापेक्षा काळ्या गव्हाची किंमत 4 पट जास्त; शेतकरी होणार मालामाल

English Summary: Bank launches new FD scheme senior citizens 8.40% interest
Published on: 03 October 2022, 05:50 IST