राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोखठोक स्वभाव आणि वक्तव्यांसाठी ओळखले जातात. सहसा, ते कामात हलगर्जी पण असो किंवा त्यांना सहमत नसलेल्या गोष्टी ते लगेच बोलून जातात. माध्यम प्रतिनिधी असो की पक्षाचा कार्यकर्ता किंवा अधिकारी, विषय आवडला नाही की अजित पवार आपल्या खास शैलीत सर्वांसमोर आपले मत ठोकपणे बोलून जातात. असाच काहीसा प्रकार बुलढाण्यात घडला.
झाले असे की अजित पवार बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांच्यासोबत पालकमंत्री राजेंद्र शिंगणे व जिल्हाधिकारी नजीर काझी होते. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टी, जिजाऊ जन्मभूमी राजवाडा आदी ठिकाणांना अजित पवारांनी भेटी दिल्या.
या भेटींमध्ये त्यांनी सकाळी बुलढाणा शहरातील दोन ठिकाणांनाही भेट दिली. या ठिकाणी त्यांनी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
राजवाड्यात आणखी एक पुतळा असल्याने पुतळ्याला पुष्पहार घालण्याची विनंती अजित पवार यांना करण्यात आली. मात्र, इतके पुतळे पाहून अजित पवार हे जिल्हाधिकारी नजीर काझी आणि पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यावर संतापले. “अहो, किती पुतळे? झालं ना आता. तिथं आत तीन पुतळ्यांना हार घातला,” असं अजित पवार म्हणाले.
एकाच स्मारकात अनेक ठिकाणी त्याच महापुरुषांचे पुतळे उभारल्याचे पाहून अजित पवार यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना खडसावल्याचे चित्र पाहायला मिळाले, हा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
Ujwala Yojana Breaking: एलपीजी गॅस सिलेंडर 200 रुपयांनी होणार स्वस्त, केंद्र सरकारची मोठी घोषणा
Mansoon News: किनारपट्टी भागाला अति मुसळधार पावसाने झोडपले, मान्सूनचा अरबी समुद्रात प्रवेश
Published on: 22 May 2022, 10:42 IST