Others News

7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी त्यांना ४ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. सप्टेंबरच्या अखेरीस होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याची औपचारिक घोषणा केली जाईल.

Updated on 24 August, 2022 3:45 PM IST

7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Staff) महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी त्यांना ४ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. सप्टेंबरच्या अखेरीस होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet meetings) त्याची औपचारिक घोषणा केली जाईल.

मोदी मंत्रिमंडळाच्या औद्योगिक महागाईच्या आकडेवारीनुसार, महागाई भत्त्यात वाढ निश्चित असल्याचे मानले जाते. AICPI निर्देशांक म्हणजेच महागाईचे आकडे हे स्पष्टपणे दाखवत आहेत की, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बंपर वाढ होणार आहे. डीए वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 38% असेल

7 व्या वेतन आयोगात, सध्याच्या रचनेत, सर्व केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34 टक्के दराने DA आणि DR दिला जात आहे. परंतु, सप्टेंबरनंतर, 38% दराने पेमेंट केले जाईल.

सप्टेंबर महिन्याच्या पगारासह तीन महिन्यांचा महागाई भत्ता दिला जाईल. ते जुलै आणि ऑगस्टसाठी डीए थकबाकीसह देखील येईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतन आणि श्रेणीनुसार पगारवाढीची कल्पना येऊ शकते.

Tur Rate: तूर उत्पादकांचे अच्छे दिन! बाजारात तुरीला विक्रमी दर, इतके दिवस राहणार तुरीचे दर तेजीत

पगार किती वाढणार, DA Calculation

7व्या वेतन आयोगाच्या पे-मॅट्रिक्सनुसार, अधिकारी श्रेणीच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. येथे आम्ही पेन्शनधारकाचे मूळ वेतन 31,550 रुपये मोजले आहे. यावरून पगार किती वाढणार हे देखील समजू शकते.

Green Pea Farming: ऑफ सीझनमध्ये वाटाणा पिकातून मिळेल भरघोस नफा; वापरा ही खास पद्धत...

मूळ वेतन - 31550 रुपये

अंदाजे महागाई भत्ता (DA) – ३८% – रु ११,९८९ प्रति महिना
विद्यमान महागाई भत्ता (DA) – ३४% – रु १०,७२७ प्रति महिना
महागाई भत्ता (DA) 4% ने वाढवल्यास - Rs 1262 (दर महिन्याला) अधिक मिळेल

38% DA वर गणना

महागाई भत्ता 4% ने वाढवल्यानंतर एकूण DA 38% होईल. जर तुम्ही कमाल पगाराच्या श्रेणीत गणना केली तर तुम्हाला 56,900 रुपयांच्या मूळ पगारावर दरमहा 21,622 रुपये DA मिळेल. एकूण वार्षिक महागाई भत्ता 2,59,464 रुपये असेल.

महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास...
धक्कादायक! शेती विकूनही कर्ज संपेना; एकाच साडीला पती-पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या

English Summary: 7th Pay Commission: Increase in DA by more than Rs.15,000 from this date
Published on: 24 August 2022, 03:45 IST