1. बातम्या

बैलचलित सुधारीत शेती औजारे वाटप व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न

परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्पांतर्गत असलेल्‍या पशुशक्‍तीचा योग्य वापर योजनेच्‍या वतीने दि. 20 जुन रोजी बैलचलित सुधारीत शेती औजारे वाटप व प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्‍या झाले तर व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री. रणजित पाटील, नियंत्रक श्री. एन. एस. राठोड, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. उदय खोडके आदींची उपस्थिती होती.

KJ Staff
KJ Staff


परभणी:
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्पांतर्गत असलेल्‍या पशुशक्‍तीचा योग्य वापर योजनेच्‍या वतीने दि. 20 जुन रोजी बैलचलित सुधारीत शेती औजारे वाटप व प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्‍या झाले तर व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री. रणजित पाटील, नियंत्रक श्री. एन. एस. राठोड, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. उदय खोडके आदींची उपस्थिती होती.

सदरिल प्रकल्‍प संपुर्ण राज्‍याकरिता असुन यापुर्वी प्रकल्पाअंतर्गत विकसीत औजारे कृषी विज्ञान केंद्र यांच्या सहाय्याने मराठवाड्यातील आठही जिल्हयातील शेतकऱ्यांना वाटप करण्‍यात आले होते. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्‍या सुचनेप्रमाणे यावर्षी ही औजारे राज्‍यातील इतर भागातील शेतकऱ्यांना वापराकरीता देण्याचे आदेशीत केले होते. 

त्‍यानुसार विदर्भातील धानोरा जंगम (ता. नांदुरा जि. बुलढाणा), करडा (ता.रिसोड, जि. वाशिम), केशपुर (ता. चिखलदरा जि. अमरावती), तळेगाव रघोजी (ता. आर्वी जि. वर्धा), व खानदेशातील तळवीपाडा (ता. नवापुर जि. नंदुरबार), मराठवाड्यातील आदीवासी बहुल वाई (ता. कळमनुरी जि.हिंगोली), मंगरूळ (ता जि. परभणी) येथील निवडक शेतकऱ्यांना विविध औजारे व यंत्र वाटप करण्‍यात आली. यात बैलचलीत सौर फवारणी यंत्र, बहुविविध टोकण यंत्र, क्रिडा टोकण यंत्र (तीन फणी), लाकडी जू, हळद काढणी यंत्र (सरीवरंबा पध्दतीकरीता), ऊसास माती लावणे यंत्र, एक बैलचलित सरी पाडणे यंत्र, एक बैलचलित कोळपे, तीन पासेचे कोळपे (बीबीएफकरीता), धसकटे गोळा करण्याचे यंत्र आदी सुधारित अवजारांचा समावेश होता.

मार्गदर्शनांत कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, अल्‍पभुधारक शेतकरी स्‍वत: ट्रॅक्‍टर विकत घेऊ शकत नाही. वाढती मजुरी, इंधन खर्च, वाढता पिक लागवड खर्च आदींमुळे एकुणच उत्पादन खर्च वाढत आहे, अशा परिस्थितीत बैलचलित सुधारीत शेती अवजारे वापरून यांत्रिकीकरणास चालणा देण्‍याची व बैलशक्तीचा वापर विविध कार्यासाठी वाढण्याची गरज आहे. तसेच सौर उर्जाचे शेतीत वापर करावा लागेल. विद्यापीठ विकसीत बैलचलित अवजारे राज्‍यातील विविध कृषी विज्ञान केंद्राच्या साहाय्याने प्रचार व प्रसार करावा, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला. संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, सदरिल बैलचलित शेती अवजारांचा शेतकऱ्यांनी योग्‍यरित्‍या उपयोग करावा व काही त्रुटी असल्‍यास संशोधकांना कळवाव्‍या, म्‍हणजे अवचारांची उपयुक्‍तता वाढीच्‍या दृष्‍टीने संशोधनाच्‍या आधारे त्‍यात सुधारणा करता येतील.

यावेळी विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्रातर्फे आदीवासी उपयोजने अंतर्गत प्रभारी अधिकारी डॉ. एस. पी. म्‍हेत्रे यांच्‍या वतीने मौजे वाई (ता. कळमनुरी जि. हिंगोली) येथील दहा अनुदानतत्‍वावर कडबा कुटी यंत्रांचेही वाटप करण्यात आले. तसेच बैलचलीत तेलघाण्याचे माननीय कुलगुरूच्‍या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तांत्रिक सत्रात प्रा. स्मिता सोलंकी, डॉ. आर. टी. रामटेके, प्रा. डी.डी. टेकाळे, प्रा. पी. . मुंढे, अजय वाघमारे आदींनी यांनी अवजारांबाबत मार्गदर्शन केले तर रेशीम उद्योगावर डॉ. सी. बी. लटपटे व सेंद्रिय शेतीवर डॉ. आनंद गोरे यांनी मार्गदर्शन केलेकार्यक्रमाचे प्रास्‍ताविक पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्पाच्या संशोधन अभियंता प्रा. स्मिता सोलंकी यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी केले तर आभार प्रा. डी. डी. टेकाळे यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी, महिला शेतकरी, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

English Summary: Training & Distribution of Bullock Operated Improved farm implements Progremme Published on: 22 June 2019, 03:55 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters