मॉन्सूनच्या पुरागमनामुळे राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये दुबार पेरण्याचे संकट टळल्याचा दावा कृषी विभागाच्या सुत्रांनी केला आहे. सोयाबीन, तुरीचा पेरा पूर्ण झाला असून कपाशी मात्र पिछाडीवर आहे. दरम्यान काही जिल्ह्यांच्या अवकर्षणग्रस्त भागात पाऊस कमी राहिल्यास आपतकालीन नियोजनाची तयारी ठेवावी लागणार आहे.
राज्यात जूनमध्ये सरासरीच्या 136 टक्के पाऊस झालेला आहे. याशिवाय जुलैचा पाऊस आतापर्यंत 66 टक्के झालेला आहे. दोन्ही महिन्यांचा आतापर्यंतचा सरासरी पाऊस 335 मिलीमीटर अपेक्षित असताना प्रत्यक्षात पाऊस 367 मिलीमीटर (109 टक्के) पडलेला आहे. विभागनिहाय स्थिती बघता जूनपासून आतापर्यंत कोकणात 107 टक्के औरंगाबाद 142 टक्के अमरावती 117 टक्के, नागपूर 108 टक्के, पुणे 72 टक्के तर नाशिक विभागात 72 टक्के पाऊस नाशिक विभागात 72 टक्के पाऊस नोंदल गेला आहे.
दरम्यान कृषी विभागातील एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, विदर्भ व मराठवाड्यात दमदार पावसामुळे दुबार पेरण्याचे संकट टळले आहे. काही भागांमध्ये कमी पाऊस असला तरी उन्हाची तीव्रता कमी होत ओल टिकून राहिल्याने कापूस व सोयाबीनला जीवनदान मिळालेले आहे. मात्र कमी पावसाच्या 3-4 जिल्ह्यांमधील अवर्षणग्रस्त भागांवर लक्ष ठेवावे लागणार आहे. बाजरी, मका अशी पर्यायी पिके घ्यावी लागतील, पाऊस अजिबात न झाल्यास पुढे फक्त रबीचे नियोजन हाच पर्याय राहील. सरासरी 39 लाख हेक्टर असलेल्या सोयाबीनचा पेरा यंदा पाच जुलैपर्यंतचा 98 टक्क्यांपर्यत झाला.
सोयाबीन पेरा अजून वाढणार आहे. कृषी तज्ज्ञ प्रा. डॉ. एस. के धापके म्हणाले की, चांगल्या बाजारभावाामुळे यंदा सोयाबीन पेरा 10-15 टक्क्यांनी वाढेल 10 ते 12 दिवस पावसाचा खंड होता. माॉन्सूनच्या पुनरागनामुळे 95 टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. खोडमाशी व चक्रीभुग्याने नुकसान झाले असल्यास ते शेतकऱ्यांच्या नजरेस फुलोऱ्यापर्यंत वाट पाहावी लागेल.
मात्र पूर्व व मध्य विदर्भात एकू पी चांगल्या स्थितीत आहे. कपाशीच्या 42 लाख हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 31 लाख हेक्टर म्हणजेच 81 टक्क्यांच्या आसपास पेरा पूर्ण केला होता. गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे उर्वरित पेरा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Share your comments