1. बातम्या

Festival Season: सणासुदीच्या दिवसांत झेंडूच्या फुलांचा दर वाढण्याची शक्यता

दुष्काळी परिस्थितीचा फटका यंदा फुलपिकांना बसला आहे. पावसाच्या भरवशावर झेंडूची लागवड झाली खरी. मात्र, यंदा पावसाने साथ न दिल्याने लागवड अन उत्पादनही घटले आहे. त्यामुळे यंदा विजयादशमीसह दिवाळी सणाला झेंडू भाव खाईल. घाऊक व्यापारी आतापासूनच फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या संपर्कात असून, यंदा किरकोळ बाजारात झेंडूची फुले १०० ते १५० च्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाला दोन पैसे हातात येण्याची उम्मीद निर्माण झाली आहे.

भावना भालशंकर
भावना भालशंकर
Festival Season

Festival Season

Agriculture News: दुष्काळी परिस्थितीचा फटका यंदा फुलपिकांना बसला आहे. पावसाच्या भरवशावर झेंडूची लागवड झाली खरी. मात्र, यंदा पावसाने साथ न दिल्याने लागवड अन उत्पादनही घटले आहे. त्यामुळे यंदा विजयादशमीसह दिवाळी सणाला झेंडू भाव खाईल. घाऊक व्यापारी आतापासूनच फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या संपर्कात असून, यंदा किरकोळ बाजारात झेंडूची फुले १०० ते १५० च्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाला दोन पैसे हातात येण्याची उम्मीद निर्माण झाली आहे. 

राज्यात बहुतांशी भागात फुलशेती केली जाते, आणि अत्यल्प प्रमाणात झेंडूचे पीक घेतले जाते. परंतु यंदा सरासरीपेक्षा निम्मा देखील पाऊस पडला नसल्याने भूर्गभागात पाणी पातळीत वाढ झाली नसल्याने झेंडूची फुलांची लागवड अत्यल्प झाली. ज्या शेतकरी झेंडूचे पिके घेत आहे. अशा शेतकऱ्यांनी झेंडूचे रोप साडेतीन ते चार रुपयांप्रमाणे विकत घेतले एका डबीत हजार सिड्‌स (बिया) असतात. गेल्या वर्षी एक हजार ७०० ते एक हजार ८०० रुपयांना मिळणारी बियाण्यांची डबी यंदा अडीच ते तीन हजार रुपयांना मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

जून-जुलैमध्ये लागवड झालेल्या फुलांना गणेशोत्सवात ३५ ते ४० रुपये घाऊक भाव मिळाला. किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलोने फुले विकली गेली. पिवळ्या व केशरी झेंडूची लागवड वाढली. केशरीपेक्षा पिवळ्या झेंडूची किंमत दहा टक्क्यांनी अधिक असते.सध्या लागवड होत असलेली फुले दिवाळीत बाजारात येऊ शकतील. दरम्यान विजयादशमीला झेंडूला घाऊक बाजारात ६० ते ७० रुपये भाव मिळेल, अशी उत्पादकांना अपेक्षा आहे. किरकोळ बाजारात दसऱ्याला झेंडूची फुले शंभरी गाठू शकतील.दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा लागवड कमी झाली. विहिरींना जेमतेम पाणी आहे. घाऊकला ५० रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाला तरच फुलशेती परवडेल. दसऱ्याला बाजारात फुले मुबलक येऊ शकतील. नवरात्र व दसऱ्याच्या सुमारास पाऊस झाल्यास तो फुलशेतीला फायदेशीर ठरून उत्पन्न वाढू शकेल.

English Summary: The rate of marigold flowers is likely to increase during festival days Published on: 17 October 2023, 02:36 IST

Like this article?

Hey! I am भावना भालशंकर. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters