1. बातम्या

सोलर ट्री : विजेशिवाय शेतात होणार सिंचन, होणार पाण्याची बचत

देशातील अनेक राज्यात पाण्याचा समस्या आहे. काही ठिकाणी नेहमी दुष्काळाचा सामना करावा लागतो. पिण्याच्या पाण्यासाठीही मोठी अडचण होत असते, मग शेतीचा काही प्रश्न येतच नाही. ज्या ठिकाणी पाणी आहे, त्याठिकाणी काही जणांकडून पाण्याचा अपव्यय वापर होताना दिसतो.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


देशातील अनेक राज्यात पाण्याचा समस्या आहे. काही ठिकाणी नेहमी दुष्काळाचा सामना करावा लागतो. पिण्याच्या पाण्यासाठीही मोठी अडचण होत असते, मग शेतीचा काही प्रश्न येतच नाही.  ज्या ठिकाणी पाणी आहे, त्याठिकाणी काही जणांकडून पाण्याचा अपव्यय वापर होताना दिसतो.  दिवसेंदिवस भूजल पातळीत घट होत आहे, पाण्याचा असाच गैरवापर आणि निसर्गाची अनियमितपणा चालू राहिला तर भविष्यात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार शक्यता आहे.  यासाठी आपल्याला पाण्या वाचविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. याच दरम्यान भारतीय सूचना विज्ञान संस्थेला (Indian Institute of Information Technology) कृषी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण प्रकल्प मिळाला आहे.  हा प्रकल्प प्रोजेक्ट ड्रिप इरिगेशनवर आधारित आहे. उत्तर प्रदेश कृषि अनुसंधान परिषद लखनऊ  (Uttar Pradesh Agricultural Research Council Lucknow)  मार्फत हा प्रोजेक्ट देण्यात आला आहे. 

भारतीय सूचना विज्ञान संस्थेला देण्यात आलेला हा प्रोजेक्ट ड्रिप इरिगेशनवर असून यात शेतातील पिकांना जितक्या पाण्याची गरज आहे, तितकेच पाणी दिले जाईल.  विशेष म्हणजे हे या प्रकल्पात असे सिंचन साधन विकसीत करण्यात आले आहे की, ते वीजेशिवाय चालणार आहे.  याला उपकरणाला सोलर ट्री (Solar tree) असे म्हणतात, याच्या मदतीने डीसी मोटरही चालवण्यात येईल. अद्याप आपण पाहिले की,  सोलर पॅनेलवर आधारीत पंप चालविला जातो.  परंतु याला खूप जागा लागते.  या कारणास्तव लहान आणि मोठ्या शेतकऱ्यांमध्ये याला यश आले नाही.   या समस्येची दखल घेत अनेक वर्षांपासून सोलर ट्रीवर काम केले जात आहे.  तीन वर्षात हा प्रकल्प पुर्ण होईल असा दावा करण्यात येत आहे.  दरम्यान जेव्हा पिकांना पाण्याची गरज असेल तर तेव्हा सोलर ट्रीचा उपयोग केला जाईल. त्यानंतर सिंचन पंप आपोआप बंद होतील.

असे करेल काम सोलर ट्री - याच्या वापराने पाण्याचा अपव्यय कमी होईल. या प्रकल्पा अंतर्गत  शेताच्या चारही कोपऱ्यात मॉईश्चर आणि तापमान सेन्सर बसविण्यात येणार आहेत.   त्यामुळे शेतात किती ओलावा आहे, तापमान किती प्रमाणात आहे, याची माहिती देईल.  जेव्हा पिकांना सिंचनाची गरज आहे, तेव्हा सिंचन पंप आपोआप चालू होईल.  सोलर ट्री हे २४ वोल्टच्या डीसी मोटरने चालविले जाऊ शकेल. याच्या मार्फत १५ ते २० एकर शेताचे सिंचन आरामात होऊ शकेल, यामुळे शेतकऱ्यांना नेहमी शेतात जाण्याची गरज राहणार नाही.

English Summary: solar tree : without electricity irrigating in field , this technique saving water Published on: 10 July 2020, 02:51 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters