News

राज्यात समाधानकारक पाऊस पडल्याने बऱ्याच भागातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे उरकली आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या मागे संकटांची मालिका सुरूच आहे. आधी पाऊस वेळेत न पडल्याने पिकांचे नुकसान होत होते. मात्र उशिरा का होईना पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावला होता. आता पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

Updated on 18 July, 2022 3:29 PM IST

राज्यात समाधानकारक पाऊस पडल्याने बऱ्याच भागातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे उरकली आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या मागे संकटांची मालिका सुरूच आहे. आधी पाऊस वेळेत न पडल्याने पिकांचे नुकसान होत होते. मात्र उशिरा का होईना पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावला होता. आता पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. वाढत्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत.

किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. उशिरा का होईना समाधानकारक पाऊस पडल्याने सोयाबीनची उगवणही चांगली झाली. मात्र सोयाबीनच्या पिकांवर गोगलगायींचा उपद्रव वाढला आहे. नुकत्याच उगवलेल्या कोवळ्या पिकांवर गोगलगायी हल्ला करून कुरतडून खात आहे त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

उदगीर तालुक्यात पुरेशा पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीची कामे उरकली. मात्र अतिवृष्टी आणि गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याची दखल घेत माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे हे शेतीबांधावर पाहणी करण्यासाठी पोहचले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना व्यापक जनजागृती मोहीम राबवावी अशा सूचनाही केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, उपस्थित होते. तसेच आम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या सोबत असू , नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिले आहे.

इंदापूरमध्ये 50 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान, 40 मेंढ्या अस्वस्थ

गोगलगायींचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याचा सर्वाधिक परिणाम हा उत्पन्नावर होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही बरेच शेतकरी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतकऱ्यांना झाली विषबाधा; एकाचा मृत्यू
Viral Video : काय सांगता ! उंच नारळाच्या झाडावर धावत चढला व्यक्ती; तुम्हालाही बसणार नाही विश्वास, पहा व्हिडीओ...

English Summary: Snail Raises Farmers' Tension; Ex-minister direct to farm construction to inspect
Published on: 18 July 2022, 03:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)