सध्या पावसाळा सुरु झाला आहे, यामुळे शेतकऱ्यांची शेतातील कामाची लगबल सुरु आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता खतांची गरज भासणार आहे. यामध्ये अनेकदा काळा बाजार केला जातो, असे असताना आता देश आणि राज्यातील खताच्या साठ्याविषयी माहिती देणारी एक वेबसाईट भारत सरकार खत मंत्रालयाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये खताचा पुरवठा स्टॉक आणि सर्वकाही माहिती दिलेली असते. यामुळे या गोष्टींना आळा बसणार आहे.
यामध्ये आता कोणत्या दुकानामध्ये किती साठा? राज्यात किती खताची आवश्यकता आहे. शिवाय खरिपात कोणत्या पिकासाठी किता खाताचे नियोजन करण्यात आल्याची माहिती या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. खत मंत्रालयाची fert.nic.in ही एक अधिकृत वेबसाईट आहे. खताचा साठा किती हे पाहण्यासाठी सर्वात प्रथम असं टाकावे लागणार आहे. त्यानंतर तुमच्यासमोर भारत सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालयाची वेबसाईट ओपन होईल.
याबाबत माहिती अशी की, वेबसाईटच्या उजवीकडे Fertilizer Dashboard असा पर्याय आहे. या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे. यानंतर लागलीच तुमच्यासमोर e-Urvarak नावाने एक पेड ओपन होणार आहे. या पेजवर देशात किती विक्रेते आहेत. शिवाय 1 एप्रिलपासून 29 मे पर्यंत किती खताची विक्री झाली आहे यासंबंधीची आकडेवारी दिली जाते. शिवाय याच पेजवर Farmer Corner या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
मोदी सरकारची 10 लाखांची घोषणा! आता मिळणार हमीशिवाय 10 लाखांचे कर्ज, असा करा अर्ज...
तसेच यामध्ये Retailer Opening Stock As On Today यावर खताच्या दुकानात किती स्टॉक आहे याची माहिती उपलब्ध होणार आहे. याकरिता तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे त्या दुकानचा Retailer ID असेल तर तो टाकावा लागणार किंवा त्या संबंधित Agency Name टाकावे लागणार आहे. यावर दुकानाचं नाव टाकून पाहू शकणार आहात. यामुळे हे फायदेशीर ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
चंद्रपुरात अख्खं मार्केट आपलय..! शेतकऱ्यांची मॉलमधून शेतीमालाची विक्री, शेतकरीच झाले व्यापारी
ऊसाचे बिल मागायला गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण, घटनेने राज्यात खळबळ
पुणतांब्यानंतर शेतकरी आंदोलन राज्यभर पसरले, आता क्रांती होणारच...
Published on: 04 June 2022, 11:02 IST