मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे मगरीने आठ वर्षाच्या मुलावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हा मुलगा चंबल नदीत आंघोळ करत असताना मगरीने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर मगरीने मुलाला नदीच्या आत ओढून नेले. यामुळे एकच खळबळ उडाली. यामुळे मोठी पळापळ बघायला मिळाली. यानंतर येथील गावकऱ्यांनी जाळी, काठ्या आणि दोरीच्या सहाय्याने मगरीला नदीबाहेर काढले.
यावेळी अनेकांनी मुलगा मगरीच्या पोटात जिवंत असेल असे म्हटले. येथील वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. गावकऱ्यांनी तोपर्यंत मगर देखील ताब्यात घेतली होती. यामुळे घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता. अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या तावडीतून मगरीची सुटका करण्याचा प्रयत्न केला.
असे असताना मात्र मुलाचे कुटुंबीय मगर सोपवण्यास तयार नव्हते. मगरीच्या पोटात मुलगा जिवंत असेल अशी त्यांना आशा होता. यामुळे मगरीच्या पोटातून मुलगा बाहेर पडत नाही तोपर्यंत आपण मगरीला सोडणार नाही अशी भूमिकाच त्यांनी घेतली होती. यामुळे याठिकाणी मोठी गर्दी देखील झाली होती.
आता रेशन कार्डधारकांना दरवर्षी मिळणार मोफत LPG सिलिंडर, वाचा कुठे सुरु झाली ही योजना..
प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी मगरीने मुलाला गिळल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी जाळी आणि काठ्यांच्या सहाय्याने मगरीला पकडले. यानंतर मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर अखेर गावकऱ्यांनी मगरीची सुटका केली. मात्र या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या;
लेट पण थेट! दमदार पावसामुळे खडकवासला धरण 100 टक्के भरले, पाण्याचा विसर्ग वाढवला
उपवास करणाऱ्यांना कोरोना होत नाही, संधोधनातून आली महत्वाची माहिती
'एकनाथ शिंदेंप्रमाणे आमदार फोडा आणि मुख्यमंत्री बना'
Published on: 12 July 2022, 02:28 IST