शेतकरी शेतात अमाप कष्ट घेत असतात. मात्र बऱ्याचदा आपत्कालीन संकटांमुळे तसेच कीड आणि रोगांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे न भरून निघणारे नुकसान होते. यासाठी केंद्र सरकार विविध योजनांच्या मदतीने शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य देत असते. त्यातीलच एक योजना म्हणजे पीक विमा योजना. मात्र नुकताच सादर झालेल्या अहवालातून पीक विमा योजनेबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी नुकसान भरपाईची मागणी वारंवार सरकारकडे करत आहेत. बऱ्याच राजकीय नेत्यांनी बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणीसुद्धा केली.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ ऑगस्ट पर्यंत सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते मात्र नुकसानच मोठे असल्याने सर्वेक्षण करताना बरेच अडथळे निर्माण होत आहेत. अशा परिस्थिती शेतकऱ्यांना पीक विमा काढणे हाच एक मोठा आधार होता.
'द इंडियन एग्रीकल्चर सायकल मॅन' नीरज प्रजापती यांची कृषी जागरणला भेट
मात्र राज्यातील तब्बल ६२ लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे. पैशाची चणचण आणि विमा मिळण्याची शाश्वती नसल्याने हे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. राज्यात शेतकरी खातेधारकांची संख्या एक कोटी आहे. त्यापैकी ३८ टक्के शेतकऱ्यांनीच विमा काढला आहे. या ३८ लाख शेतकऱ्यांनी आपली पिके सुरक्षित केली आहेत तर ६२ लाख शेतकऱ्यांनी योजनेत सहभागच घेतला नाही.
महत्वाच्या बातम्या:
Custred Apple: 'या' दोनच गोष्टींचे करा परफेक्ट नियोजन, सिताफळ देईल बंपर उत्पादन, वाचा सविस्तर
शेतकऱ्यांनो आता शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी मिळणार एक लाख रुपये, असा घ्या लाभ...
Published on: 04 August 2022, 04:37 IST