News

Maharashtra: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. आता राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाला खिंडार पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Updated on 02 September, 2022 1:15 PM IST

Maharashtra: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक मोठमोठ्या राजकीय घडामोडी (Maharashtra Politics) घडत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे आणि फडणवीस सरकार (Shinde and Fadnavis Govt) स्थापन झाले आहे. आता राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडण्याची शक्यता आहे. काँग्रेस (Congress) पक्षाला खिंडार पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे दोन माजी मंत्री मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचे सात आमदार भाजपमध्ये (BJP) प्रवेश करू शकतात, असे सांगण्यात येत आहे. यापैकी दोन आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो.

दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला काँग्रेसकडून सात मते मिळाली होती. या सात आमदारांनी काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या विरोधात मतदान करून भाजप आमदाराला पाठिंबा दिला होता.

Cotton Crop: कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! कापसाला मिळणार सोन्याचा भाव

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काही दिवसांनी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर विधानसभेत फ्लोअर टेस्ट झाली, त्यावेळीही काँग्रेसचे १० आमदार सभागृहात पोहोचले नाहीत. आमदारांनी सभागृहात न येण्यामागे अनेक कारणे दिली होती.

काँग्रेसचे आमदार स्वतः भाजपमध्ये प्रवेश करू इच्छितात

या आमदारांनाच भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपने त्यांना कोणतीही ऑफर दिलेली नाही. हे आमदार काँग्रेसवर नाराज असून, त्यांना भाजपमध्ये जाण्याची इच्छा आहे. महाराष्ट्रात पक्षाची प्रगती होत नसल्याचे संतप्त आमदारांचे मत आहे.

त्याच वेळी, सर्वोच्च नेतृत्व देखील पाहिजे त्या पद्धतीने काम करत नसल्याचे त्यांचे मत आहे. वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी वेळ मागितल्यानंतर आठ ते दहा दिवस वाट पाहावी लागत असल्याचे आमदारांनी सांगितले.

...आणि बाहेरची जनावरे चक्क अजितदादांनी ताणली!! दादांनी सांगितला तो किस्सा

बीएमसी निवडणूक भाजप-मनसे एकत्र लढू शकतात

दुसरीकडे, बीएमसी निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र लढू शकतात, असे सांगण्यात येत आहे. युतीची घोषणा काही दिवसांत होऊ शकते. नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचीही भेट झाली.

राज ठाकरेंनी स्वत:चा वेगळा पक्ष स्थापन केला तेव्हा बीएमसी निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळेच बीएमसीमध्ये आपला झेंडा फडकवायचा असेल, तर मनसेची साथ लागेल, असे भाजपचे मत आहे.

महत्वाच्या बातम्या:
CNG Cars: 8 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतायेत या 5 बेस्ट सीएनजी कार
शेतकऱ्यांना दिलासा! ई-केवायसी’बाबत केंद्राचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर...

English Summary: Seven MLAs including former Chief Minister will join BJP?
Published on: 02 September 2022, 01:15 IST