किसान क्रेडिट कार्डच्या मदतीने शेतकऱ्यांची स्थिती सुधरत आहे. सावकराच्या मनमानी व्याजाच्या बोझाखाली बळीराजा दबू नये यासाठी शासनाने किसान क्रेडिट कार्डची सुविधा सुरु केली आहे. या कार्डच्या मदतीने शेतकरी आपल्या शेतीशी संबंधित अवजारे, खते , इतर गोष्टींची खरेदी करत असतो. दरम्यान अनेक शेतकऱ्यांना या कार्डचा लाभ मिळावा यासाठी सरकारची लोकप्रिय झालेली पीएम किसान योजनेसी केसीसीला जोडण्यात आले आहे. या योजनेचा लाभ देशातील १० लाख कोटी शेतकरी घेत आहेत.
जेणेकरून शेतकऱ्यांना हे कार्ड घेण्यासाठी कमी कागदपत्रे लागतील आणि त्वरीत किसान क्रेडिट कार्ड मिळेल. याशिवाय राज्याचे कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी कार्डधारकांना देण्यात येणारे ३ लाखाचे कर्ज बिन व्याजी द्या अशी मागणी केली आहे. जर ही मागणी मान्य झाली तर शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत होईल. दरम्यान हे किसान क्रेडिट कार्ड अनेक बँका देतात. त्यातील एक बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक भारतातील सर्वात मोठी बँक आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने किसान क्रेडिट कार्डधारकांसाठी एक ऑफर आणली आहे. केसीसी धारकांसाठी एसबीआय सोप्या अटी आणि शर्तीवर कर्ज घेत आहे.
१.६० रुपयांच्या कर्जासाठी कोणत्याच प्रकारचे तारण लागत नाही. एका वर्षाच्या फेडीवर सात टक्के व्याज आकारले जाते. तर तीन लाख रुपयांच्या कर्जाच्या व्याजदरात २ टक्के सूट दिली जाते. वेळेवर कर्जाची परत फेड केल्यास अतिरिक्त ३ टक्क्यांची सूट मिळते. जर देयक तारखेपर्यंत कर्जाची परत फेड नाही झाली तर आपल्याला कार्डप्रमाणे व्याज द्यावे लागेल.
याप्रमाणे केसीसी कर्जावर पीक आणि परिसरासाठी कृषी विमा मिळतो. केसीसीमध्ये काही रक्कम शिल्लक असेल तर त्यावर बँकेच्या खात्याप्रमाणे व्याज भेटते. एसबीआयच्या केसीसी धारकांना कोणतेच शुल्क न देता एटीएम-कम- डेबिट कार्ड देते. एसबीआयच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, सर्व शेतकरी याचा फायदा घेऊ शकतात. खासगी आणि सामूहिक पद्धतीने शेती करणारे पण या योजनेचा लाभ घेऊ शकतील. एसबीआयनुसार, योग्य अर्जासह एक प्रतिज्ञापत्रासह ओळखपत्र आणि रहिवासी दाखला द्यावा. यासह आपले मतदान कार्ड, पासपोर्ट, किंवा वाहन चालक परवाना, आधार कार्डचा उपयोग आपण ओळख पत्रासाठी करु शकतो.
Share your comments