शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणी येतात, त्यांना वेळेवर वीज देखील मिळत नाही. असे असताना आता रोहित्र बिघडला तर अनेकदा याचा त्रास शेतकऱ्यांना होतो. रोहित्र वाहतुकीसाठी (Transformer Trasport) वाहन व्यवस्थेची तरतूद रोहित्र दुरुस्त करणाऱ्या एजन्सी किंवा महावितरणकडे (Mahavitaran) आहे.
यामुळे नादुरुस्त किंवा दुरुस्त रोहित्रांच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांनी कंत्राटदारांशी किंवा कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नयेत, अशी सूचना सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केली आहे. सध्या शेतीला सिंचनासाठी सुरळीत विद्युतपुरवठ्याची आवश्यकता असते. त्या दृष्टीने महावितरण प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.
मंजूर भारापेक्षा अधिक विद्युतभाराच्या वापरामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांनी प्रमाणित कपॅसिटर बसवून अखंडित वीज वापराचा लाभ घ्यावा. तसेच अनधिकृत वीज वापर करीत असलेल्या कृषिपंप धारकास तसेच अधिक भार, जसे की तीन एचपी मंजूर असताना पाच एचपीचा पंप वापरणे अशा कृषिपंपधारकांनी वीज पुरवठ्यासाठी अर्ज करून नियमाने वीजजोडणी घ्यावी, असेही ते म्हणाले.
आता शेती विकत घेण्यासाठी सरकारकडून मिळते अनुदान, जाणून घ्या काय आहे योजना..
अनेकदा वीजबिलापोटी ग्राहकांकडून जमा करण्यात आलेल्या बिलांचा भरणा काही ठिकाणी महावितरणकडे तत्काळ होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. वीज कर्मचारी व वीजबिल भरणा केंद्रांनी त्यांच्याकडे संकलित झालेली बिले तत्काळ महावितरणकडे जमा करावी. यासाठी अनेकदा उशीर झाला आहे. यामुळे कामे देखील उशिरा होतात.
जनावरे रोडवर सोडली तर होणार गुन्हा दाखल! नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल
तसेच ग्राहकांनीही वीजबिलापोटीचे व्यवहारही पावतीशिवाय करू नये. सध्या महावितरण आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा संघर्ष सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांची वीज कट करण्यात आली होती. यामुळे अनेक आंदोलने देखील झाली. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान देखील झाले.
महत्वाच्या बातम्या;
केळीच्या दरात मोठी वाढ, उच्चांकी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा
जनावरांचा बाजार शुक्रवारपासून सुरू, शेतकरी व्यापाऱ्यांना दिलासा..
कोरोना पुन्हा वाढला! केंद्रीय मंत्र्यांचे मास्क सक्तीबाबत मोठे वक्तव्य
Published on: 23 December 2022, 04:56 IST