1. बातम्या

Teacher Recruitment 2023 : राज्यात लवकरच ३० पदांसाठी शिक्षक भरती; शिक्षणमंत्र्यांची माहिती

राज्यात रिक्त असलेल्या शिक्षक पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आतापर्यंत बिंदूनामावली आणि अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या २३ जिल्ह्यातील रिक्त पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Teacher Recruitment 2023 News

Teacher Recruitment 2023 News

Pune News : राज्यात लवकरत ३० हजार शिक्षक पदांची जाहिरात निघणार आहे. २३ जिल्ह्यात शिक्षकांची रिक्त पदे आहेत, यासाठी जाहिरात काढली जाणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. यामुळे आता राज्यातील लाखो उमेदवारांचं रिक्त पदांच्या जाहिरातीकडे लक्ष लागलं आहे.

राज्यात रिक्त असलेल्या शिक्षक पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आतापर्यंत बिंदूनामावली आणि अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या २३ जिल्ह्यातील रिक्त पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

शिक्षणमंत्री पुण्यात आले होते. तेव्हा ते म्हणाले की, शिक्षकांच्या ३० हजार रिक्त पदांच्या भरतीसाठी बिंदूनामावलीसारख्या तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. आतापर्यंत २३ जिल्ह्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. यामुळे आता राज्यातील उमेदवारांचे लक्ष या जाहिरातीकडे लागले आहे.

दरम्यान, अनेक वर्षापासून राज्यात शिक्षक भरती रखडलेली आहे. पण आता शिक्षक भरतीला मुहूर्त मिळाला आहे. यामुळे उमेदवारांचा आशा पल्लवित झाल्या आहेत. तसंच जाहिरातीची तारीख जरी निश्चित करण्यात आलेली नसली, तरी यासंदर्भात तातडीची पावलं राज्य सरकारकडून उचलण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

English Summary: Recruitment of teachers for 30 posts in the state soon Information from the Minister of Education Published on: 17 October 2023, 12:25 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters