भारतातून दरवर्षी सुमारे 14 लाख मेट्रिक टन आंब्याची निर्यात होते. परंतु यावर्षी फळ पिकांसाठी सरकारकडून मिळणाऱ्या भरघोस अनुदानामुळे शेतकऱ्यांनी आंब्याला अधिक पसंती दिली असून देशात 27 मे पर्यंत तब्बल 21 हजार 625 निर्यातक्षम आंबे प्लॉटची उच्चांकी नोंदणी करण्यात आली आहे.
डाळिंब, नारळ या नगदी फळ पिकांसोबत आत्ता आंब्याला शेतकऱ्यांकडून सर्वाधिक पसंती दिली जात आहे. जर आंबा उत्पादनाचा विचार केला तर भारतात गुजरात,महाराष्ट्र आणि कर्नाटकात निर्यात करणे योग्य आंबे यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु या वर्षी तामिळनाडू, केरळ आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ही निर्यातक्षम आंबा उत्पादन घेण्यासाठी अपेडा कडे नोंद करण्यात येत आहे. यावर्षी सर्वाधिक नोंदणी ही कर्नाटक राज्याने केली असून त्या खालोखाल आंध्र प्रदेश, महाराष्ट्र तसेच गुजरात मध्ये नोंदणी झाली आहे.
फळपिकांसाठी सरकार कडून म्हणजेच केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान, ठिबक, शेततळे यांना आर्थिक मदत दिली जात असल्याने शेतकरी आता आंबा लागवडीला प्राधान्य देत आहे. भारतातून जवळजवळ दरवर्षी 14 लाख मेट्रिक टन आंबा निर्यात होतो. परंतु मागच्या वर्षापासून चक्रीवादळ आणि अतिवृष्टीने तडाखा दिल्यानंतर मागच्या वर्षापासून जवळजवळ चार ते पाच लाख मेट्रिक टन आंबा निर्यात कमी झाली. नुकत्याच येऊन गेलेल्या तौक्ते चक्रीवादळाने यावर्षीही आंबा बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
तरीही आंबा निर्यात मोठ्या प्रमाणात सुरू असून यामध्ये हापूस, केसर या प्रकारच्या आंब्यांना मागणी असल्याने शेतकऱ्यांनी वानांना पसंती दिली आहे
Share your comments