आपल्याला कुठेही कारने जायचे राहिले तर सगळ्यात अगोदर डोक्यात इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणाऱ्या खर्चात टोल चा लागणारा खर्चविचारात घ्यावाच लागतो.
कारणबऱ्याच ठिकाणी टोल प्लाजा वर टोलवसुली केली जाते. अर्थात हा टोल टॅक्स असतो, परंतु महामार्गावरून प्रवास करताना हा टोल टॅक्स द्यावाच लागतो. परंतु या टोल टॅक्स संबंधी राजस्थान सरकारने एक मोठा निर्णय घेत खाजगी वाहन धारकांना खूप मोठा दिलासा दिला आहे. राजस्थान शासनाने खासगी वाहनधारकांसाठीटोल टॅक्स माफीचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे अनेक प्रकारचे खाजगी वाहन धारकांना मोठा दिलासा मिळणार असूनकुठे जाण्यायेण्याच्या खर्चात बचत होणार आहे. परंतु हा निर्णय घेत असतांना राजस्थान शासनाने मात्र कमर्शियल अर्थात व्यावसायिक वाहनांवरील टोल वसुली मात्र कायम ठेवली आहे. या निर्णयानुसार आता फक्तराजस्थानातील सर्व महामार्गांवर फक्तव्यावसायिक वाहनांकडून टोल आकारला जाईल.
यासंबंधीचे टेंडर एमपीआरडीसीने प्रसिद्ध केले असूनराजस्थान सरकारने हा नियम लागू केला आहे. कारण या टोल वसुली मुळे बऱ्याच सर्वसामान्य जनतेला खूप मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो व त्यामुळे बऱ्याच प्रकारची आर्थिक अडचण निर्माण होते त्या दृष्टिकोनातूनराजस्थान प्रशासनाने महत्त्वाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला.
गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीनंतर या निर्णयाच्या धर्तीवर टेंडर करण्यात आल. पुढील महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून टोल ब्लॉक सुरू होणार आहे.
महाराष्ट्रात निर्णय घेतला जाणार का?
राजस्थान सरकारने घेतलेला हा निर्णय सर्वसामान्यांना खूप मोठ्या प्रमाणात दिलासा देणारा ठरणार असून याच धर्तीवर महाराष्ट्र शासना कडून निर्णय घेतला जाणार का हाच प्रश्न सर्वसामान्य जनतेकडूनउपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रात देखील बऱ्याच वर्षापासून या टोल नाक्याचा प्रश्न असून सर्वसामान्यांमध्ये टोलवसुलीच्या या मुद्द्यावरून प्रचंड प्रमाणात नाराजी पाहायला मिळते.
राजस्थान शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन निर्णय घेणार का व सर्वसामान्यांना दिलासा मिळेल का?हे येणार्या भविष्यकाळात कळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:महत्त्वाचा शासन निर्णय! दुधाला एफआरपी लागू करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन
Published on: 24 May 2022, 01:23 IST