श्रीगोंदा: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आज श्रीगोंदा तालुक्याच्या (Shrigonda) दोऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवार तालुक्याच्या राजकारणाबाबत मोठा खुलासा केला आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बबनराव पाचपुते आणि राष्ट्रवादीचे राहुल जगताप यांच्यात रंगत लढाई झाली. या लढाईत राहुल जगताप यांनी बाजी मारली. आणि राष्ट्रवादीचा गड असणारा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ शाबूत ठेवला.
हेही वाचा: "उद्घाटनाला येतो पण विरोधी पक्षनेता म्हणू नको; कधी काय होईल सांगता येत नाही", चर्चांना उधाण
अजित पवार म्हणाले, २०१९ ची विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात आमची जागा आली नाही. २०१९ च्या निवडणुकीत निवडून येऊ की, नाही अशी शंका घनश्याम शेलार यांना होती. निवडणुकीत पराभव होईल म्हणून राहुल जगताप देखील निवडणुकीत उभे राहिले नाहीत. असा खुलासा आज स्वतः अजित पवार यांनी श्रीगोंद्यात बोलताना केला.
हेही वाचा: पाचुपते यांच्यासह नागवडे गटाला धक्का; श्रीगोंदा तालुक्यासाठी पवारांनी आखली रणनीती..
"उद्घाटनाला येतो पण विरोधी पक्षनेता म्हणू नको"
एका कार्यकर्त्याने दादांना, तुम्ही उद्घाटनाला या, असं निमंत्रण दिले. त्यावर अजितदादांनी मिश्किल कोटी केली. हो रे बाबा. मी येतो. मात्र विरोधी पक्षनेता (opposition leader) म्हणू नको. आता कधी काय होईल सांगता येत नाही. त्यांच्या मनात आलं आणि 20 लोक घेऊन गेले, आता सर्वत्र ओके ओके सुरू आहे, अशी कोटी अजित पवार यांनी केली. एकदम हास्यमय वातावरण तयार झाले.
हेही वाचा: शेतकऱ्यांनो रस्त्यावरच्या लढ्यासाठी सज्ज राहा: राजू शेट्टी यांचा एल्गार
Published on: 03 September 2022, 03:13 IST