आपल्या घरातील मुलं किंवा पत्नीचं भविष्य सुरक्षित राहावं, त्यांना भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, असं वाटत असेल तर तुम्ही एनपीएसमध्ये (NPS) पत्नीच्या नावाने गुंतवणूक करू शकता. शेतकरी वर्गही या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
या योजनेत (scheme) गुंतवणूक केल्यास तुमच्यानंतरही तुमच्या पत्नीला स्वावलंबी जगता येईल. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर न्यू पेन्शन सिस्टम (NPS) अकाउंट उघडून रक्कम जमा करू शकता.
NPS अकाउंट तुमच्या पत्नीच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर एकरकमी रक्कम देईल. यासोबतच त्यांना प्रत्येक महिन्याला पेन्शनच्या (pension) स्वरूपात नियमित रक्कमही मिळेल. विशेष म्हणजे तुम्ही NPS अकाउंटद्वारे तुमच्या पत्नीला दरमहा किती पेन्शन मिळावी हेदेखील गुंतवणूक करताना ठरवू शकता.
हे ही वाचा
Cotton Varieties: देशी कापसाचे नवीन वाण 160 दिवसात तयार; जाणून घ्या 'या' वाणाविषयी
तुम्ही फक्त 1,000 रुपयांमध्ये तुमच्या पत्नीच्या नावावर NPS खातं उघडू शकता. NPS खातं वयाच्या 60व्या वर्षी मॅच्युअर होतं. या योजनेतील नवीन नियमांनुसार, तुम्ही पत्नीच्या वयाची 65 वर्षे होईपर्यंत NPS अकाउंट सुरू ठेवू शकता.
महिन्याला 45 हजार रुपये
जर तुमची पत्नी 30 वर्षांची असेल आणि तुम्ही तिच्या NPS खात्यात दरमहा 5000 रुपये गुंतवत असाल आणि त्या गुंतवणुकीवर दरवर्षी 10 टक्के रिटर्न मिळत असेल, तर वयाच्या 60 व्या वर्षी तिच्या खात्यात एकूण 1.12 कोटी रुपये असतील.
यातील 45 लाख रुपये तिला परत मिळतील. याशिवाय तिला आयुष्यभर दरमहा सुमारे 45 हजार रुपये पेन्शन मिळत राहील.
हे ही वाचा
Crop Insurance Scheme: पीकविम्याचे धोरण बदलले; शेतकऱ्यांना होणार 'हा' मोठा फायदा, जाणून घ्या..
किती पेन्शन मिळणार?
NPS ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना (Social Security Scheme) आहे. यामध्ये तुम्ही गुंतवलेली रक्कम प्रोफेशन फंड मॅनेजर (Professional Fund Manager) मॅनेज करतात. केंद्र सरकार या प्रोफेशनल फंड मॅनेजर्सना ही जबाबदारी देते.
त्यामुळे तुमची एनपीएसमधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. परंतु योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवलेल्या पैशावर रिटर्न मिळण्याची खात्री नसते. मात्र फायनॅन्शिअल प्लॅनर्सच्या मते, NPS ने सुरुवातीपासून सरासरी 10 ते 11 टक्के वार्षिक रिटर्न दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
"या म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करावी"; रूपाली ठोंबरे पाटलांची राज्यपालांवर जहरी टीका
Common People: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; 1 ऑगस्टपासून होणार हे 'पाच' बदल
Monkeypox: 'या' देशात मंकीपॉक्सचा दुसरा बळी; जगभरात आढळले 20 हजारांहून रुग्ण
Share your comments