अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (PDKV, Akola) नवीन कुलगुरू (vice-chancellor) निवडीसाठी शोध समितीनंतर राज्यपालांनी अंतिम मुलाखती घेतल्या होत्या.
या पदावर कोणाची निवड होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता ही उत्सुकता संपली आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. शरद गडाख यांची निवड करण्यात आली आहे.
पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटली; भाज्यांच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ
पाच जणांनी बुधवारी (ता.७ ) राजभवनात निवडीच्या दृष्टीने अंतिम मुलाखती दिल्या होत्या. यात विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्यासह इतर पाच जणांचा सहभाग होता. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचा कार्यकाळ संपुष्टात आला, त्यामुळे या पदावर नवीन व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
यासाठी अर्ज मागवण्यात आले होते.
शेतकऱ्यांना 25 टक्के वाढीव नुकसान भरपाई मिळणार; सरकारकडून अधिसूचना जारी
जवळपास 30 जणांनी अर्ज केले होते
जवळपास ३० जणांनी अर्ज केले होते. शोध समितीने त्यांच्या मुलाखती घेऊन अंतिम पाच जणांची नावे राजभवनाकडे पाठविली होती. या नावांमध्ये डॉ. खर्चे यांच्यासह भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संचालक अशोककुमार पात्रा (भोपाळ), भारतीय कापूस संशोधन परिषदेचे संचालक डॉ. विजय वाघमारे (नागपूर), महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख (राहुरी, नगर) आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर (परभणी) या पाच जणांचा समावेश होता.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो तारणकर्ज योजनेचा लाभ घेऊन चांगल्या दराने धान्य विक्री करा; जाणून घ्या प्रक्रिया
ऐण सणासुदीच्या काळात तांदूळ महागणार; सर्वसामान्यांना मोजावे लागणार जादा पैसे
सरकारच्या 'या' योजनेत 1 लाख रूपयांचे होतील 5 लाख रुपये; एकदा गुंतवणूक करून पहाच
Published on: 19 September 2022, 05:20 IST