कांदा निर्यात बंदी, व्यापाऱ्यांवर दबाव आणून तसेच इराण सारख्या देशातील कांदा आयात करून सरकार कांद्याचे भाव आणि किरकोळ मार्केट मधील दर नियंत्रित करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे.परंतु भारतात कांद्याला असलेली मागणीही प्रचंड प्रमाणात असून इराणकडून केलेला आयात कांद्याचा पुरवठा मागणीच्या मानाने अगदी नगण्य आहे.त्यामुळे कांद्याच्या दरावर याचा परिणाम होणार नाही असे जाणकारांचे मत आहे.यावर्षी झालेली कांद्याची दरवाढ नैसर्गिक असून त्याला बरीचशी कारणे कारणीभूत आहेत.
यावर्षी पडलेल्या अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बाजारामध्ये कांद्याची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आढळून आली आहे. कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी कांदा परदेशातून आयात करण्यात येत आहे. सध्याच्या काळामध्ये जवळ-जवळ सहाशे ते सातशे टन कांदा जेएनपीटी बंदरात दाखल झाला आहे.
इराणमधून जवळ पंचवटी कांद्याचा एक कंटेनर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाला. तेरमधील कांद्याला ५० ते ६० रुपये प्रति किलो असा दर मिळत असून त्या तुलनेत आपल्याकडील कांद्याला ६० ते ७५ रुपये प्रति किलोप्रमाणे दर मिळत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर आता शेजारील आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा आपल्याकडे येतो. कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. परंतु जास्त पाऊस आणि लॉकडाउनमुळे कांदा व्यापार्यांना मार्केटमध्ये विकता आला नाही. तसेच महाराष्ट्रात चक्रीवादळ,अतिवृष्टी यासाठी आता त्यामुळे उभे कांद्याचे पीक खराब झाले तसेच तापमानातील चढ- उतारामुळे साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला. या सगळ्या कारणांमुळे बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याची टंचाई भासत असून त्याचा परिणाम दरवाढीवर पाहायला मिळत आहे.आपल्याकडे इराण सोडून इजिप्त, अफगाणिस्तान, चीन येथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात करण्यात येते. परदेशातून कांद्याची आवक होत असतील तरी आपल्याकडे ग्राहक देशी कांद्याला पसंती देताना दिसत आहेत. मुंबई परिषद ५० बाजार समितीत सोमवारी जवळजवळ शंभर गाड्यांची आवक झाली होती.
Share your comments